
बोर्डाच्या परीक्षा असो की इतर कोणत्याही परीक्षा विना टेन्शनच्या जात नाहीत. परीक्षा जसजशा जवळ येतात तशी विद्यार्थ्यांची धाकधूक वाढत जाते. परीक्षेच्या आधी अभ्यासाचं टेन्शन येणं ही सामान्य गोष्ट आहे पण सतत चिंता करणं खूप तणावपूर्ण असतं. मग या गोष्टीची सवयच आपण स्वतःला लावतो. पाहू हे टेन्शन कसं कमी करता येईल..
मुलांनी शांत मनाने परीक्षा द्यावी, यासाठी घरातील वातावरणही आनंदी असणे आवश्यक आहे. घरात तणावपूर्ण वातावरण असेल कर मुलाची तणावाची पातळी वाढू शकते ज्यामुळे ते परीक्षेत चांगली कामगिरी करू शकणार नाही. जर तुम्ही तणावाखाली आणि चिंताग्रस्त आहात तर ताबडतोब दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
◆ अभ्यास पुर्ण करण्यासाठी जेवण टाळणं किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी जेवता जेवता अभ्यास करणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या असून त्याचा आपल्यावर दुष्परिणाम होतो. या काळात सकस संतुलित आहार घ्या. ज्यामुळे अभ्यास करणं सोपं होईल आणि आळसही येणार नाही.
◆ परीक्षेला जाण्याच्या आधी कोणतीही घाई करू नका. सर्वकाही व्यवस्थित पॅक करुन ठेवा आणि मगच घरातून बाहेर पडा. गडबडीत परीक्षा केंद्रावर जाऊ नका. कारण गडबडीत काही विसरलं तर पुन्हा तुम्ही गोंधळून जाल.
◆ मुलांना सतत हे सांगा की, त्याने परीक्षेला करा किंवा मरो अशी परिस्थिती मानू नये. मात्र, त्याने उत्कृष्ट कामगिरी करावी त्यासाठी खूप प्रयत्नदेखील करावे. तसंच परीक्षेत पास-नापास होणे किंवा कमी जास्त गुण मिळणे ही काही मोठी गोष्ट नाही, कमी गुण मिळवूनही अनेक व्यक्ती आयुष्यात यशस्वी झाले आहेत.
◆ केवळ पाठांतर करणे आणि अभ्यासाठी रात्रभर जागं राहणे. शालेय विद्यार्थ्यांना 8 तासांपेक्षा जास्त झोप घेणे आवश्यक आहे. रात्रभर जागे राहण्यापेक्षा हे जास्त फायदेशीर ठरले आहे. रात्रीची चांगली झोप मिळाली तर मन ताजे आणि उत्साही राहते.