1 नोव्हेंबरपासून गॅस सिलेंडर, बँका, रेल्वेच्या वेळापत्रकासह अनेक नियम बदलणार
गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी OTP आवश्यक असेल*
▪️1 नोव्हेंबरपासून गॅस सिलिंडर घरोघरी पोहोचवण्याची संपूर्ण प्रक्रिया बदलण्यात येणार आहे. नवीन नियमानुसार, गॅस बुक केल्यानंतर, ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल. ओटीपीशिवाय बुकिंग केले जाणार नाही. त्याचवेळी, सिलिंडर घरी पोहोचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयला हा ओटीपी सांगितल्यानंतरच ग्राहक सिलिंडर घेऊ शकतील.
एकीकडे गगनाला भिडलेल्या महागाईमुळे जनता हैराण झाली आहे, तर दुसरीकडे येत्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून म्हणजेच नोव्हेंबरपासून देशभरात अनेक मोठे बदल होणार आहेत.
बँकांमध्ये पैसे जमा करण्यापासून ते काढण्यासाठी शुल्क घेतले जाणार
▪️1 नोव्हेंबरपासून येणार्या नवीन नियमात आता बँकांत पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने याची सुरुवात केली आहे. BOB नुसार, पुढील महिन्यापासून लोकांकडून विहित मर्यादेपेक्षा जास्त बँकिंगसाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. याशिवाय 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांना कर्ज खात्यासाठी 150 रुपये भरावे लागणार आहेत.
▪️नवीन नियमानुसार, बचत खात्यात तीनवेळा पैसे जमा करणे विनामूल्य असेल, परंतु जर खातेदाराने एका महिन्यात तीनपेक्षा जास्त वेळा पैसे जमा केले तर त्याला प्रत्येक वेळी 40 रुपये द्यावे लागतील.
ट्रेनच्या वेळापत्रकात बदल
▪️नवीन महिन्याच्या सुरुवातीला भारतीय रेल्वे देशभरातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करणार आहे. वास्तविक हे बदल आधीच ठरलेले होते. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी वेळापत्रक बदलणार होते. परंतु, काही कारणास्तव ते 1 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलले गेले. ट्रेनचे नवे वेळापत्रक पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून लागू होणार आहे.
▪️मिळालेल्या माहितीनुसार, या बदलामध्ये 13 हजार पॅसेंजर ट्रेन आणि 7 हजार मालगाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय देशात धावणाऱ्या सुमारे 30 राजधानी गाड्यांच्या वेळा बदलण्यात येणार आहेत.






