1 जानेवारीपासून सर्व वाहनांवर Fastag अनिवार्य; नितीन गडकरी यांची घोषणा
देशात नव वर्षापासून म्हणजे 1 जानेवारी 2021 पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. 1 जानेवारीपासून 100 टक्के टोल फास्टॅगद्वारे वसूल केला जाणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार असून सुट्ट्या पैशांची डोकेदुखीही थांबणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
येत्या 1 जानेवारी 2021पासून देशात सर्व वाहनांसाठी फास्टॅग बंधनकारक करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांना टोल प्लाझावर थांबण्याची गरज पडणार नाही.
याचा प्रवाशांनाच फायदा होणार आहे. प्रवाशांचा सुट्ट्या पैशांची डोकेदुखी थांबणार आहेच शिवाय इंधन आणि वेळेचीही बचत होणार असल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. सध्याच्या घडीला देशात फक्त राष्ट्रीय महामार्गांवरच 80 टक्के रकमेची वसुली फास्टॅगद्वारे केली जात आहे.