
जामखेड : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी चोंडी (ता. जामखेड) येथे गेल्या १९ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. येथील प्रकृती खालावलेले उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांच्या मुलीने रविवारी दुपारी उपोषणस्थळी भेट दिली. वडिलांची अवस्था पाहून तिला अश्रू अनावर झाले. राज्य सरकारने लवकरात लवकर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तिने केली.धनगर आरक्षणासंदर्भात सरकारने मुंबईत बैठक घेतली. मात्र ठोस निर्णय घेतला नाही. रविवार उपोषणाचाएकोणीसवा दिवस आहे. सरकार वेळकाढूपणा करत असेल तर राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपोषणकर्तेबाळासाहेब दोडतले यांनी पत्रकार परिषदेत दिली.उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची कन्या प्रतीक्षा बंडगर हिने सरकारने धनगर आरक्षणाचे प्रमाणपत्र देऊनलवकरात समाजाचा प्रश्न सोडवावा. वडील सुरेश बंडगर व दुसरे उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर यांनी आता पाणीही वर्ज्य केले आहे. उपचार घेण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे सरकारने दखल घेऊन शक्य लवकरात लवकर उपोषण सोडावे, अशी मागणी केली. यावेळी तिला वडील व इतर उपोषणकर्त्यांची अवस्था पाहून अश्रू अनावर झाले.मुंबई येथे सरकारने आरक्षणसंदर्भात बोलावलेल्या बैठकीची चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर राज्यभरातील नेते व समाज बांधव चोंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा देत आहेत. तीव्र आंदोलनासाठी तयार असल्याचे सांगत आहेत.



