? कोरोनाच्या संकट काळात काही लोक कापडी, तर काही N-95 मास्कचा वापर करत आहे. याबाबत कॅलिफोर्निया विद्यापीठाचं संशोधन मेडिकल एक्सप्रेसमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. यात N-95 मास्क सर्वांत प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.
?️ मास्कबाबत खोकला आणि शिंकेतून बाहेर पडणाऱ्या संसर्गजन्य शिंतोड्यांमुळे हवेत विषाणूचा प्रसार होण्याचा धोका जास्त आहे, त्यामुळे N-95 मास्क जास्त प्रभावी आहे.
??♂️ ‘हे’ मास्क इतके सुरक्षित-
▪️ N-95 मास्क- तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हे मास्क घातल्यानंतर शिंक आणि खोकल्यावाटे संसर्ग पसरण्याचा धोका 10 पटींनी कमी होतो.
▪️ कापडी मास्क- तर कापडी मास्क वापरल्यानंतर रुग्णाच्या खोकल्यातून, शिंकेतून मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य विषाणू बाहेर पडतात, असं संशोधकांच्या लक्षात आलं.
▪️ घरगुती मास्क- घरगुती मास्क खोकल्याची गती आणि तीव्रता रोखण्यास सक्षम नसल्याचं दिसून आलं आहे. या मास्कमधून मोठ्या प्रमाणात विषाणू रोखले जात असले तरीदेखील हवेमध्ये मोठ्या प्रमाणात कपड्याच्या धाग्यांचे अंश पसरतात.
? मास्क वापरणं सर्वांना बंधनकारक असणार आहे. मास्क कोरोनाच्या विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत करतं. त्यामुळे कोरोना व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर N-95 मास्क वापरा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.




