?|| सुप्रभात ||

421

*आजचे पंचांग (रविवार, डिसेंबर १९, २०२१) युगाब्द : ५१२३**भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अग्रहायण (मार्गशीर्ष) २८ शके १९४३**सूर्योदय : ०७:०६ सूर्यास्त : १८:०५**चंद्रोदय : १८:१३ चंद्रास्त : ०७:०७**शक सम्वत : १९४३ प्लव**चंद्र माह : मार्गशीर्ष**पक्ष : शुक्ल पक्ष**तिथि : पौर्णिमा – १०:०५ पर्यंत**नक्षत्र : मृगशीर्ष – १६:५३ पर्यंत**योग : शुभ – १०:१० पर्यंत**करण : बव – १०:०५ पर्यंत**द्वितीय करण : बालव – २३:२२ पर्यंत**सूर्य राशि : धनु**चंद्र राशि : मिथुन**राहुकाल : १६:४३ ते १८:०५**गुलिक काल : १५:२० ते १६:४३**यमगण्ड : १२:३६ ते १३:५८**अभिजितमुहूर्त : १२:१४ ते १२:५८**दुर्मुहूर्त : १६:३७ ते १७:२१**वर्ज्य : ०२:१७, डिसेंबर २० ते ०४:०५, डिसेंबर २०**१९ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.**१९६१च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज अधिपत्य समाप्त झाले, तसेच गोवा, दमण व दीव हा प्रदेश संपूर्णपणे मुक्त झाला. या अर्थाने, १९६१चे युद्ध हा गोवा मुक्ती आंदोलनाचा (किंवा खरे तर गोवा मुक्ती प्रक्रियेचा) शेवटचा व अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा होता.* *तरीसुद्धा आपणास हे लक्षात घ्यावे लागेल, की हे मुक्तियुद्ध म्हणजे गोवा मुक्ती आंदोलनाचा फक्त एक लहानसा (परंतु निर्णायक) भाग होता. या युद्धाव्यतिरिक्त गोवा मुक्ती आंदोलनाचा खूप मोठा इतिहास आहे, ज्यामध्ये स्थानिक गोवेकर स्वातंत्र्यसैनिकांचा खूप मोठा वाटा आहे.**आज गोवा मुक्ति दिन आहे**भारतातील एक प्रसिद्ध दानशुर उद्योगपती कस्तुरभाई लालभाई. अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयात ते शिक्षण घेत असताना १९१२ साली अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि शिक्षण अर्धवट टाकून ‘रायपूर मॅन्युफॅक्चरिंग कं. लि.’ या कुटुंबाच्या मालकीच्या कापड उद्योगाची जबाबदारी त्यांना घ्यावी लागली.**त्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाखाली रायपूर कापडगिरणीची प्रगती चालू राहिली. कापसाचा दर्जा ओळखण्याचे उपजत ज्ञान त्यांना होते आणि कापूस पिकविणाऱ्या प्रदेशांना स्वतः भेटी देऊन उत्तम कापूस खरेदी करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. १९२० साली ‘अशोक मिल्स लि.’ आणि १९३० मध्ये ‘अरविंद मिल्स’ या आणखी दोन कापडगिरण्या त्यांनी स्थापन केल्या. दरम्यान १९२४ साली डबघाईला आलेली ‘सारसपूर मिल्स लि.’ ही कापडगिरणी त्यांनी ताब्यात घेतली आणि १९२८ मध्ये ती नव्याने सुरू केली. ‘अरूणा’, ‘नूतन’, आणि ‘अहमदाबाद न्यू कॉटन मिल्स’ या आणखी तीन कापड उद्योगांचे व्यवस्थापन त्यांच्याकडे आले. ‘अनिल स्टार्च प्राडॅक्ट्स’; कापडगिरण्यांना लागणारी यंत्रे निर्माण करणारी ‘अमित प्रॉडक्ट्स’; रंग, रसायने तयार करणारे बलसाड येथील ‘अतुल प्रॉडक्ट्स’ या सर्व कंपन्या कस्तुरभाईंच्या कुशल नेतृत्वामुळे लवकरच नावारूपाला आल्या.**ऐन तारुण्यात त्यांचा महात्मा गांधी, सरदार पटेल आणि अन्य राष्ट्रीय नेत्यांशी संबंध आला. भांडवलदार हे संपत्तीचे केवळ विश्वस्त आहेत, या गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्या जीवनावर खोल परिणाम झाल्याचे दिसते. कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवाद नेमण्याचा ते आग्रह धरीत.* *आपल्या कारखान्यांत त्यानी कामगारकल्याणासाठी सरकारी संस्था काढल्या, कारकून वर्गासाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद केली आणि पाळणाघरे सुरू केली. त्या वेळी तशी कायदेशीर तरतूद नसतानाही त्यांनी ते केले हे महत्त्वाचे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक म्हणून ते १९३७ मध्ये निवडून आले आणि त्या पदावर १९४९ पर्यंत राहिले. पुन्हा याच बँकेवर त्यांनी संचालक म्हणून १९५७ ते १९६१ पर्यंत काम केले.**अनेक संस्थांची अध्यक्षपदे कस्तुरभाई ह्यांनी पदे भूषविली.‘अहमदाबाद मिलओनर्स* *असोसिएशन’ (१९३३-३५), ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ (१९३४-३५), ‘इंडियन कॉटन मिल्स फेडरेशन’ (१९५६-६०) ह्या त्यांपैकी काही महत्त्वाच्या संस्था होत. कैरो येथील आंतरराष्ट्रीय कापूस परिषदेस (१९४३) ते भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या बैठकांना ते भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून आवर्जून जात असत.**सार्वजनिक कामाची त्यांना मनापासून आवड होती.**गुजरातमध्ये १९१८ पासून ज्या ज्या वेळी दुष्काळ पडत असे, त्या त्या वेळी स्वतः पुढे होऊन ते निधी उभारीत.* *‘गांधी मेमोरियल फंड’चे ते अध्यक्ष होते. १९३७ साली स्थापन झालेल्या ‘अहमदाबाद एज्युकेशन सोसायटी’चे ते प्रारंभापासून अध्यक्ष होते. या संस्थेतर्फे विविध ज्ञानशाखांची महाविद्यालये उघडण्यासाठी त्यांनी स्वतः लक्षावधी रुपयांच्या देणग्या दिल्या, तसेच गुजरात विद्यापीठाची भव्य वास्तु बांधण्यासाठी त्यांनी निधी गोळा केला.**भारत सरकारच्या प्रत्यक्ष कर सल्लागार समितीचे ते सदस्य होते. पंचवार्षिक योजनांचा पाठपुरावा करताना खाजगी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अविश्रांत श्रम घेतले.**१९६८ मध्ये भारत सरकारने पद्मभूषण पदवी देऊन त्यांचा गौरव केला**१८९४ : पदमभूषण पुरस्कार सन्मानित व राष्ट्रवादी विचार सरणीचे उद्योगपती कस्तुरभाई लालभाई यांचा जन्म ( मृत्यू : २० जानेवारी, १९८० )**१९३४ : भारताच्या १२व्या व पहिल्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म**घटना :**१९२७ : राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग , अश्फाकुल्लाह खान यांचा हुतात्मा दिन – या क्रांतीकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली**१९४१ : अडॉल्फ हिटलर जर्मन सैन्याचे सरसेनापती झाले**१९६१ : पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारे दीव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट झाले**१९६३ : झंजीबारला युनाइटेड किंग्डम कडून स्वातंत्र्य मिळाले व सुलतान जमशीद बिन अब्दुल्लाह यांची राजसत्ता अस्तित्वात आली**१९८३ : ब्राझील मधील रिओ डी जानिरो येथून फिफा वर्ल्ड कप चोरीस गेला.**• मृत्यू :**१९९७ : स्वातंत्र्य सैनिक, तत्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ सुरेन्द्र बारलिंगे यांचे निधन ( जन्म : २० जुलै, १९१९ )**१९९८ : भावगीत गायक जनार्दन विठ्ठल रानडे यांचे निधन ( जन्म :२३ मे, १८९६)**१९९९ : क्रिकेट कसोटी खेळाडू , क्रीडा संघटक हेमचंद्र तुकाराम उर्फ बाळ दाणी यांचे निधन**२०१४ : भारतीय पत्रकार, दिगदर्शक एस बालसुब्रमण्यम यांचे निधन ( जन्म : २८ डिसेंबर, १९३५ )**जन्म :**१९१९ : चरित्र अभिनेते ओमप्रकाश बक्षी उर्फ ओमप्रकाश यांचा जन्म (मृत्यू :२१ फेब्रुवारी, १९९८)**१९६९ : भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म**आपला दिवस मंगलमय जावो*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here