
महसूल विभागामार्फत राज्यातील तलाठ्यांच्या 4122 पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. त्यात 31 डिसेंबर 2022 रोजी रिक्त होणारी 1012 व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या 3110 पदांचा समावेश आहे. या भरतीची कार्यवाही महसूल विभागाने सुरु केली आहे.
? महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मुंबईमध्ये बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी राज्यात 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत तलाठी भरतीसाठीची आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडून जिल्हानिहाय तपशील सादर करण्यास सूचित केले आहे.
? विभागनिहाय रिक्त जागा
▪️ नाशिक – 1035
▪️ औरंगाबाद – 847
▪️ कोकण – 731
▪️ नागपूर – 580
▪️ अमरावती – 183
▪️ पुणे – 746
▪️ एकूण – 4122
? मागासवर्गीय कक्षाकडून बिंदूनामावली प्रमाणित करुन त्यासंदर्भातील सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षणाचा तपशीलही जिल्हानिहाय मागवला आहे. त्यामुळे सुशिक्षीत तरुणांना नोकरीची चांगली संधी मिळणार आहे.