ॲन्टीजेन चाचण्याः ४१२ चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह

688

अकोला,दि.११(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.१०) दिवसभरात झालेल्या ४१२ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

        काल दिवसभरात  अकोला येथे तीन, अकोट येथे तीन, बाळापूर येथे२०, बार्शीटाकली येथे एक, तेल्हारा येथे दोन, मूर्तिजापूर येथे १७, अकोला महानगरपालिका येथे २७८, अकोला आयएमए येथे तीन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे २२, वैद्यकीय महाविद्यालय महाविद्यालयातील ५६, हेगडेवार लॅब येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे ४१२ जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here