८० वर्षाच्या वृध्द महिलेवर शारिरीक अत्याचार केले प्रकरणी आरोपीस १० वर्षे शिक्षा

८० वर्षाच्या वृध्द महिलेवर शारिरीक अत्याचार केले प्रकरणी आरोपीस १० वर्षे शिक्षा

“अहमदनगर :आरोपी नामे नाना चंदु निकम, वय २१, रा.रतडगाव, ता. जि. अहमदनगर याने. फिर्यादीवर शारिरीक अत्याचार केल्या प्रकरणी अहमदनगर येथील मे. जिल्हा न्यायाधीश क. ३, श्रीमती माधुरी बरालिया यांनी वरील आरोपीस भादंवि कलम ३७६ प्रमाणे १० वर्ष सक्त मजुरी व २५,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरी तसेच भादंवि कलम ३२३ प्रमाणे ६ महिने सक्त मजुरी व ३,०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्त मजुरी वर्षाची अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेपैकी १५,०००/- रूपये फिर्यादीस देण्याचा व उर्वरीत रक्कम रुपये १०,०००/- सरकार जमा करण्याचा आदेश केला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने अतिरीक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. सदर केसची थोडक्यात हकिकत अशी कि,दि. ०८/०३/२०२० रोजी फिर्यादी वृध्द महिला ही सकाळी ०९.३०सुमारास शेतातील घराजवळ असलेल्या विहीरीवरून पाणी भरत असताना आरोपी नाना चंदु निकम याने गलोरीने फिर्यादी वृध्द महिलेच्या तोंडावर दगड मारून व तिची मान पिरगाळुन तिला खाली पाडले व तिच्या जबरदस्तीने शारिरीक अत्याचार केला व तिच्या गुप्तांगावर हाताने बोचकारले. त्यामुळे फिर्यादी ही मोठ्याने ओरडल्याने फिर्यादीच्या दोन्ही सुना तिचेजवळ आल्या. त्यावेळी फिर्यादीने घडलेली घटना त्यांना सांगितली. त्यानंतर फिर्यादीस उपचारासाठी दवाखान्यात नेले. सदर घटनेबाबत फिर्यादीने आरोपीविरुध्द नगर तालुका पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध ३७६, ३२३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पो.उप निरीक्षक डी. आर. जास्वाल यांनी केला व आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी पंच प्रविण अशोक खेडेकर, फिर्यादी वृध्द महिला, तिची सुन, डॉ. प्रसाद सायगावकर, पी.एस.आय. नितेश राउत, पी. एस. आय. धनराज जारवाल, पो.हे.कॉ. संतोष लगड, पो.कॉ. संभाजी बोराडे असे एकुण ०८ साक्षीदार तपासण्यात आले. मा. न्यायालयासमोर आलेला साक्षी-पुरावा व अतिरीक्त सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून मा. न्यायालयाने आरोपी नाना चंदु निकम यास भादंवि कलम ३७६ प्रमाणे १० वर्ष सक्त मजुरी व २५,०००/- रूपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने सक्त मजुरी तसेच भादंवि कलम ३२३प्रमाणे ६ महिने सक्त मजुरी व ३,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस सक्त मजुरी वर्षाची अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेपैकी १५,०००/- रुपये फिर्यादीस देण्याचा व उर्वरीत रक्कम रुपये १०,०००/- सरकार जमा करण्याचा आदेश केला. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने अतिरीक्त सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. त्यांना पो.हे.कॉ. पोपट रोकडे, ब.नं. २०४ यांनी सहकार्य केले.

Sep 22 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here