४५ वर्षे वयावरील पत्रकारांचे कोविड लसीकरण

811

४५ वर्षे वयावरील पत्रकारांचे कोविड लसीकरण

अकोला,दि. ७ (जिमाका)- जिल्ह्यातील ४५ वर्षे वयावरील पत्रकारांच्या व माध्यमकर्मींच्या कोविड लसीकरणास आज सुरुवात करण्यात आली. येथील आर .के.टी आयुर्वेद रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज हे लसीकरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीरसाहेब, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय डांगे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकार संघटनांकडे नावे नोंदविलेल्या ४५ वर्षे वयावरील पत्रकारांचे लसीकरण यावेळी करण्यात आले. लसीकरण केंद्राचे डॉ. मोहम्मद यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या लसीकरणासाठी परिश्रम घेतले. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की, कोविडची लस ही सुरक्षित आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ४५ वर्षे वयावरील व्यक्तिंना लस दिली जात आहे. लस घेतल्यानंतरही मास्क वापरणे, हात धुणे, परस्परांमध्ये अंतर राखणे या त्रिसुत्रीचा अवलंब सुरु ठेवावा. आपण आपले कुटुंबिय व सर्व नागरिकांना कोविड पासून सुरक्षित राखावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here