२७ गुन्हे दाखल असलेला व महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रमुख सराईत गुन्हेगार सागर भांड पुणे जिल्ह्यातून जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.”

दिनांक ०४/०८/२०२१ रोजीचे रात्रीचे वेळी फिर्यादी श्री. दिलीप देवराम तमनर, वय ३५ वर्षे, रा. तमनर आखाडा, राहूरी, ता. राहूरी त्यांचे मोटार सायकलवरुन खंडाळा, श्रीरामपूर येथून तमनर आखाडा येथे नगर-मनमाड रोडने त्यांचे घरी येत असताना रात्री ७/४५ वा. चे सुमारास शनिशिंगणापूर फाटा येथे लघुशंकेसाठी थांबले असता सोनई रस्त्याने काळे रंगाचे पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या अनोळखी चार इसमांनी फिर्यादीस कत्तीचा धाक दाखवून फिर्यादी जवळील रोख रक्कम, मोबाईल, बॅग व मोटार सायकल असा एकूण २०,०००/- रु. किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.. सदर घटनेबाबत राहूरी पो.स्टे. येथे गुरनं. ६५२ / २०२१ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच त्यापूर्वीही वाहन चालकांना अडवून लुटमार करण्याच्या घटना घडलेल्या असल्याने मा. पोलीस अधीक्षक सो, अहमदनगर यांचे सुचनानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून १) नितीन मच्छिन्द्र माळी, वय- २२ वर्षे, रा. मोरे चिंचोरे, ता. राहूरी, २) गणेश रोहीदास माळी, वय २१ वर्षे, रा. खडकवाडी, मूळा डॅम जवळ, ता. राहूरी, ३) रवि पोपट लोंढे, वय २२ वर्षे, रा. घोडेगाव, ता. नेवासा, ४) निलेश संजय शिंदे, वय २१ वर्षे, रा. पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर, ५) रमेश संजय शिंदे, वय- २० वर्षे, रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी व ६) एक अल्पवयीन साथीदार यांना यापुर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून राहूरी पो.स्टे. येथे हजर केलेले आहे. सदर गुन्ह्यातील वरील नमुद आरोपी यांचा मुख्य साथीदार टोळी प्रमुख सागर भांड हा सदरचा गुन्हा केल्यापासून

नजरेआड झालेला होता. श्री. अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाल स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे आरोपी सागर भांड याचा शोध घेत असताना पोनि / अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि आरोपी सागर भांड हा रांजणगाव, ता. शिरुर, जि. पुणे येथे भाड्याने खोली घेवून रहात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/गणेश इंगळे, पोहेका/दत्तात्रय गव्हाणे, पोना/सुरेश माळी, शंकर चौधरी, विशाल दळवी, सचिन आडबल, दिपक शिंदे, पोका प्रकाश वाघ, चालक पोहेकॉ/ संभाजी कोतकर अशांनी मिळून रांजणगाव येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती काढून आरोपी नामे सागर आण्णासाहेब भांड, वय २५ वर्षे, रा. मूळ रा. ढवण वस्ती, सावेडी, अहमनगर, ह.रा. रांजणगाव गणपती, धुमाळसर यांची खोली, ता. शिरुर, जि. पुणे यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे वरील नमुद गुन्ह्याबाबत तसेच आणखी कोठे कोठे गुन्हे केलेले आहेत याबाबत कसून चौकशी केली असता त्याने व त्याचे वरील नमुद साथीदारांनी मिळून मागील दोन महीण्यांचे कालावधीमध्ये नगर-पुणे रोडवर, सुपा शिवार, नगर-मनमाड रोड व संगमनेर-लोणी रोड या ठिकाणी वाहन चालकांना अडूवन लुटमार केलेली असून आरोपी सागर आण्णासाहेब भांड व त्याचे टोळीतील वरील नमुद साथीदारांकडून खालील प्रमाणे रस्तालुटीचे एकुण ७ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

आरोपी सागर आण्णासाहेब भांड याचे विरुध्द यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, दरोड्याची तयारी, फसवणूक,

बेकायदा हत्यार बाळगणे, चोरी अशा स्वरुपाचे खालील प्रमाणे एकूण २७ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभकुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here