२०२० शेवटी भारतात येणार महाप्रलय ; वैज्ञानिकांचा इशारा

नवी दिल्ली – या वर्षाच्या सुरुवातीपासूनच देशावर कोरोना संकटाचे काळे ढग दाटून आले. कोरोनाचा प्रसार रोखता यावा यासाठी लॉक डाऊन लागू करावं लागलं. लॉक डाऊनमुळे कोरोनाला आळा बसला खरा मात्र त्यामुळे प्रचंड आर्थिक हानी झाली. या सर्वांमुळे अनेकांसाठी 2020 हे वर्ष प्रचंड नुकसानीचे ठरले आहे. 2020 संपायला आणखी दोन महिन्यांचा अवकाश असतानाच आता आणखी एक मोठं संकट उभे ठाकले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैज्ञानिकांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, लवकरच पूर्ण हिमालय क्षेत्रात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवतील. वैज्ञानिकांनी हिमालयातील पर्वतांच्या पृष्ठभागासह मातीचं परीक्षण आणि रेडिओकार्बन विश्लेषण केलं. भूवैद्यानिक, भौगोलिक माहितीच्या अभ्यासातून वैज्ञानिकांनी भूकंपाचा अंदाज वर्तवला आहे. याबद्दलचा अहवाल ‘सिस्मोलॉजिकल रिसर्च लेटर्स जर्नल’मध्ये प्रकाशित झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here