१९० रुपयांची लाच घेणाऱ्यावर ACB चा ट्रॅप:

अहमदनगर
सेवा सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची इकरारनाम्याप्रमाणे शेतीच्या सात बारावर नोंद घेण्यासाठी आरोपीने तलाठी गणेश भाऊसाहेब आगळे {वय ३३ वर्षे, जेऊर बायजाबाई, ता. जि. नगर, वर्ग- 3, रा. शिरसगाव, ता. नेवासा, जि. नगर}, नामदेव शंकर रसाळ, {वय ५८ वर्षे, खाजगी इसम, रा. जेऊर बायजाबाई, ता. जि. नगर},

सोन्याबापू महादेव मगर, {वय ३५ वर्षे खाजगी इसम, रा. जेऊर बायजाबाई ता. जि. नगर} यांनी आज {दि.१६} पंचासमक्ष १९० रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारली. यातल्या नामदेव रसाळने याने लाच स्वीकारण्यास सांगितली. त्याप्रमाणे रसाळने १९० रुपये लाचेची रक्कम स्वीकारून सोन्याबापू मगरकडे दिली असता या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम पवरे, पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. अहमदनगर, पर्यवेक्षण अधिकारी हरिष खेडकर, पोलीस उपअधीक्षक, ला. प्र. वि. अहमदनगर, निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here