१७९ अहवाल, एक पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

477

१७९ अहवाल, एक पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

अकोला,दि.९(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) १७९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १७८ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.८) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७९०(४३१९८+१४४१५+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०७७८२ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०४२३२ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१५३ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०७७३२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६४५३४ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटिव्ह

आज दिवसभरात एका जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही महिला रुग्ण असून अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे. दरम्यान काल (दि.८) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

दहा जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एक, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून एक, इन्फिनिटी हेल्थकेअर येथून एक, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन तर होम आयसोलेशन मधील पाच असे दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४९ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७९०(४३१९८+१४४१५+१७७) आहे. त्यात ११३४ मृत झाले आहेत. तर ५६६०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४९ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here