१० वर्षापासुन दरोड्याचे गंभीर गुन्ह्यामध्ये फरार अंसलेले अट्टल दरोडेखोरास सोनई पोलीसांनी केली

शिताफीने अटक

सोनई पोलीस ठाणे व जिल्ह्यातील बाहेरील इतर पोलीस ठाण्यामध्ये दरोडा, ड्रॉप, ज. चोरी अशा गंभीर गुन्ह्यमध्ये सुमारे १० वर्षापासुन फरार असलेला आरोपी इसम रामहारी जाफर काळे वय २८ रा पासवाडी ता नेवासा याचे वास्तव्यावावत सोनई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री रामचंद्र कर्पे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत दिनांक २/९/२०२१ रोजी बातमी मिळाली की दोरड्याचे गुन्ह्यांमधील बरेच वर्षापासून फरार असलेला रामहारी जाफर काळे हा पानसवाडी ता नेवासा येथे त्याचे राहाते घरामागील डाळींबाचे बागेमध्ये दडुन बसलेला आहे व छापा टाकल्यास तो मिळुन येईल या मिळालेले वातमीचे आधारे स.पो.नि श्री कर्पे व सोनई पोलीस ठाण्याचे दुय्यम अधिकारी श्री ज्ञानेश्वर थोरात व पो.स्टे चे इतर अमंलदार यांनी रात्री २२.०५ वा पानसवाडी ता नेवासा येथे बातमी प्रमाणे आंधारामध्ये डाळींबाचे बागेस चोहोबाजुने वेढा घालुन सापळा रचला व आरोपीचा टॉर्च चे साह्याने शोध घेत असताना डाळींबाचे बागेमध्ये मध्यभागी आंधारात तो दडुन बसलेला आढळुन आला त्याला पोलीसांची चाहुल लागल्याने त्याने वागेमधुन पळ काढला असता. वरील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी शिताफीने पाठलाग करुन त्यास काही अंतरावरच वागेचे परिसरात पकडुन जेरबंद केले आहे. त्याचे नाव पत्याची खात्री केली असता त्याने पकडल्यानंतर पोलीसं ना त्याचे नाव रामहारी जाफर काळे वय २८ रा पानसवाडी ता नेवासा असा नावपत्ता सांगितला त्याचे नाव पत्यांची खात्री करुन त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्याचे विरुध्दचे गुन्हेगारी अभिलेख पडताळुन पाहिला असता तो पोलीस ठाणे सोनई येथील सन २०१२ व २०१३ या | सालामधील गंभीर स्वरुपाचे दरोडा, जबरी चोरी गुन्हयामध्ये गुन्हा केले तारखेपासुन पसार झालेला व पाहिजे असलेले आरोपींचे अभिलेखावरील आरोपी असल्याची खात्री झाली आहे. नमुद आरोपी यास सोनई पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ८७ / २०१२ भा.द.वि. का. क ३९५, ४२०, ४११ आर्म अॅक्ट ४/२५ या दाखल गुन्हयामध्ये दिनांक ३/९/२०२१ रोजी ००.३६वा अटक करण्यात आली आहे. त्यास आज रोजी मा. नेवासा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यंाचे न्यायालयामध्ये रिमांड कामी हजर ठेवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

अटक केलेला आरोपी हा सशस्त्र दरोडे, जबरी चोरी करणारा स्वस्तात सोने देतो असे अमिष दाखवून दरोड्याचे गुन्हे करणारा सराईत व रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याचे विरुध्द खालील प्रमाणे गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. व या सर्व गुन्ह्यामध्ये नमुद आरोपी हा अद्यापपावेतो फरार आहे. अटक झालेला नाही.

१) सोनई पो. स्टे गु.र.नं ८७/२०१२ भा.द.वि.का.क ३९५, ४२०, ४११ आर्म अॅक्ट ४/२५

२) सोनई पो.स्टे गु.र.नं ११८/२०१२ भा.द.वि.का.क. ३९५,४२०

३) सोनई पो.स्टे गु.र.नं १७८/२०१३ भा.द.वि.का.क. ३९४,३४ ४) नेवासा पो.स्टे गु.र.नं १०८/२०१७ भा.द.वि.का.क. ३९७,३४९,३,४

५) कोपरगाव ग्रा.पो.स्टे गु.र.नं ९८ / २०१८ भा.द.वि. का. क. ३९५, ४२०, १२० (ब) सदरची कामगिरी ही मा. श्री मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अ.नगर, मा. श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, मा. श्री सुदर्शन मुंढे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग, शेवगाव यंाचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्यातील श्री आर.टी. कर्पे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी श्री ज्ञानेश्वर थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण, पो.हे.कॉ दत्ता गावडे, पो.नां. विशाल थोरात, पो. ना आदीनाथ मुळे, पो. ना. बाबा वाघमोडे, पो.कॉ विठ्ठल थोरात, पो.कॉ अमोल जवरे, पो.कॉ सचीन ठोंबरे, पो.कॉ अमोल भांड यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Share this:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here