हॉटेल राजयोगमधील कुंटनखान्यावर छापा अहमदनगर पोलिसांची कारवाई
अहमदनगर- स्वतःच्या मालकीच्या हॉटेलमध्ये कुंटनखाना चालविणा-या मालिकासह पाचजणांना पकडण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. अक्षय अनिल कर्डिले (वय 25, हॉटेल मालक), सौरभ अनिल कर्डीले (वय 21, दोघे रा.खंडाळा, ता.जि.अहमदनगर), विकी मनोहरलाल शर्मा (वय 29 रा आझादनगर अरणगाव रोड ता.जि अहमदनगर), गणेश मनोहर लाड (वय 21,रा वाळकी ता.जि.अहमदनगर), संदिप पंडीत जाधव (वय 23, रा खंडाळा ता.जि.अहमदनगर) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत.जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील व सपोनि राजेंद्र सानप, पोसई जारवाल व नगर तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, नगर तालुक्यातील खंडाळगावच्या शिवारात नगर ते दौड जाणा-या रस्त्याच्या बाजूला असणारे हॉटेल राजयोगमध्ये संगनमताने आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या मालकीच्या हॉटेलमध्ये महिला,मुलींना देहविक्री करण्यासाठी बोलावून घेऊन त्याच्यामार्फतीने गैरमार्गाने देहविक्री करून कुंटनखाना चालवित असताना नगर तालुका पोलिसांना हाॅटेल मालकासह पाचजण मिळून आले. पोलिसांनी त्या सर्वांना ताब्यात घेऊन सफौ जब्बार रहिमखों पठाण यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिस ठाण्यात गु.रजि.नं. 613/2021 स्त्रीया व मुलींचा अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा सन 1956 चे कलम 3,4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.