
हैदराबाद येथील प्रसिद्ध समाजसेवक सलमान खान यांच्या हैदराबाद युथ करेज (HYC) संघटनेने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, तसेच ग्राम पंचायत निवडणुका लढवण्याचे संकेत दिलेले आहेत. सलमान खान यांच्या HYC ग्रुप तर्फे संपूर्ण देशभर गरजू आणि पीडित लोकांना मदत कण्यात येते. यामुळे देशातील युवकांमध्ये सलमान खान यांच्याबद्दल प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. महाराष्ट्रातील युवक आणि राजकीय क्षेत्रातील बुद्धिजीवी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर सलमान खान HYC ग्रुप महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळाले आहेत. सलमान खान hyc ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बिलाल शेख यांनी लातूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की HYC ग्रुप तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदेश वर्किंग कमिटी (कोअर कमिटी) सोबत संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून पक्ष संघटन वाढवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक, मागासवर्गीय तसेच सर्वधर्मीय गरजू लोकांना सहज मदत उपलब्ध होवून त्यांचे जीवनमान उंचावनार तसेच त्यांना मिळालेले संवैधनिक अधिकार मिळवून देण्यासाठी HYC प्रयत्न करणार असल्याचे सलमान खान HYC ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख बिलाल यांनी सांगितले.


