हे सरकार आहे की ”तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी” – आशिष शेलार

    793

    हे सरकार आहे की ”तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी” – आशिष शेलार

    मुंबई | शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. समता नगर पोलिसांनी या प्रकरणी सहा शिवसैनिकांना अटक केली. अटक केलेल्या सहाही शिवसैनिकांना जामीन मिळाला आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

    सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवली आहे काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. आशिष शेलार यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

    मुंबई बाँम्बस्फोट आरोपी याकूब मेमनची कबर वाचविण्यासाठी अजामीनपात्र गंभीर गुन्हा आणि देशप्रेमी निवृत्त नेव्ही अधिकारी मदन शर्मांना मारहाण करणाऱ्यांवर जामिनपात्र साधा गुन्हा. वा रे वा! विवेकबुध्दी गहाण ठेवली काय?, हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here