
हार्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, माणसाच्या वयाच्या 30 वर्षे वयानंतर हृदयाचे जास्तीत जास्त ठोके दर मिनिटाला एकाने कमी होऊ शकतात. रक्त पंप करण्याची क्षमता दर दशकात 5% ते 10% कमी होऊ लागते. चाळिशीनंतर टेस्टोस्टेरॉन दरवर्षी 1% कमी होऊ शकते आणि वयातील हे बदल व्यायाम करून कमी करता येतील, असं त्यांचं मत आहे. जाणून घेऊ फिजिओथेरपिस्ट वसीम अख्तर यांनी सांगितल्या आहेत वयाचा वेग थांबवणाऱ्या काही व्यायामांच्या प्रकारांविषयी..
1) पायऱ्या चढणे
हा एक सोपा व्यायाम आहे, परंतु तुमच्या संपूर्ण खालच्या शरीरातील सर्व स्नायूंवर काम करतो. यात शिन्स, ग्लूट्स, क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्ट्रिंग्जचा समावेश आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा व्यायाम तुमची हाडे आणि सांधे मजबूत करतो.
2) रेझिस्टन्स ट्रेनिंग
यामुळे स्नायूंची ताकद वाढते. तुमच्या सहनशक्तीची पातळी सुधारते. वेटलिफ्टिंग, बार, डंबेल या व्यायाम प्रकारात येतात. हा सर्वोत्तम वृद्धत्वविरोधी व्यायाम आहे.
3) हात आणि पाय क्रॉस करणे
यामध्ये शरीराचा मधला भाग विरुद्ध दिशेने हलवण्याचा प्रयत्न करा. यामुळे ताण निर्माण होतो आणि स्नायू तयार होण्यास मदत होते. यामुळे मेंदूच्या उजव्या आणि डाव्या बाजूंमधीले संपर्क सुधारतो. मेंदूचे कार्यही बळकट होते.
4) हँगिंग लेग रेज
हा थोडा आव्हानात्मक व्यायाम आहे. तुमच्या शरीराच्या मधल्या भागासाठी आणि लॅट्सच्या जवळ असलेल्या व्ही आकाराच्या स्नायूंसाठी म्हणजे पाठ आणि खांद्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. एक प्रकारे हे संपूर्ण शरीर मजबूत करते आणि वृद्धत्वाची नैसर्गिक गतीदेखील कमी करते.




