हेल्प मी इंडिया चा व्हिडिओ साई चरणी अर्पण

563

हेल्प मी इंडिया चा व्हिडिओ साई चरणी अर्पण

साई द्वारका ट्रस्ट संचलित हेल्प मी इंडिया फौंडेशन ची माहिती देणाऱ्या व्हिडीओ चे नुकतेच साई बाबांच्या १०३ व्या पुण्यतिथी निमित शिर्डी येथील साई मंदिरात अनावरण करण्यात आले. यावेळी अॅड, धनंजय जाधव, सुजित गोंदकर, किरण गवते, मितेश शाह, विराज मुनोत, राहुल मुथा, सुनिल सुडके, सुरज शेळके, सोमनाथ जाधव, इंद्रभान बोरुडे, महेश महादर आदी उपस्थित होते. गरीब आणी गरजू रुग्णांच्या रिपोर्ट ची खात्री करून घेऊन त्याबाबत समाज माध्यमातून आवाहन करून समाजातील दानशूर व्यक्तींकडून आर्थिक मदत उपलब्ध देणे हे काम हेल्प मी इंडिया करीत आहे.

यावेळी बोलताना मा. नगरसेवक अॅड. धनंजय जाधव म्हणाले की, प्रत्येक जीव महत्वाचा आहे परंतु अनेक रुग्ण पैश्यांच्या अभावी आपले प्राण गमावतात, कोरोना काळात तर हि परिस्थिती आपण सर्वानी जवळून पहिली, अनेकदा एकीकडे रोगांचे निदान झाल्यानंतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो पण तोपर्यंतचा खर्च आणि औषधांचा खर्च करण्याची परिस्थिती अनेकांची नसते, तर दुसरीकडे दानशूर व्यक्तींना एखादा रुग्ण खरोखर गरजू आहे का याची शहनिशा करणे अवघड होते व परिणामी बरेचदा फसवणूक होते. या दोन्ही बाजू विचारात घेऊन आम्ही मदत मागणारा आणि मदत देणारा या दोघांमधील दुवा होण्याचे काम हेल्प मी इंडियाच्या माध्यमातून विनामोबदला करीत आहोत.

बदलत्या जीवनशैली मुळे अनेक नवीन आजारांना आपण आपण सामोरे जात आहोत, लहान मुलांमध्येही किचकट आजार निर्माण होत आहेत ज्याचे उपचार अत्यंत महाग आहेत. दुख वाटल्याने कामी होते असे म्हणतात तसेच आपण सर्वजण एकत्र येऊन जर गरजूंना मदत केली तर नक्कीच त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि एक प्राण वाचेल या पेक्षा मोठे आत्मिक समाधान मिळते.

हेल्प मी इंडिया ची स्वतंत्र स्वयंसेवकांची टीम खात्री करून घेऊन रुग्णांना लागणारी आर्थिक मदतीची कल्पना आम्हाला देते त्यानुसार आम्ही वेबसाईट वरून आणि समाज माध्यमातून मदतीचे आवाहन करतो हि रक्कम थेट रुग्णालयाच्या किंवा रुग्णाच्या खात्यात जमा होते. ट्रस्टची वैशिष्टे

1) ट्रस्ट स्वतःच्या खात्यात देणगी स्वीकारत नाही.

2) ट्रस्ट फक्त गरजू रुग्णांना पेशंट ची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवते.

3) मोठे देणगीदारांपेक्षा रोज किंवा महिन्याला थोडी थोडी आर्थिक मदत देणारे देणगीदार तयार करणे.

4) ज्या आजारांना शासकीय योजनेमध्ये मदत मिळत नाही त्यांना मदत मिळवून देण्याचे काम करते.

5) लहान मुळे व जेष्ठ नागरिक यांना प्रथम वैद्यकीय उपचारासाठी मदत मिळवून देण्याचे काम करतो.

मदतीसाठी संपर्क : 9860655555 / 9545567088 / 9921597442

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here