हेडलाईन्स, 4 ऑक्टोबर 2020

999

? महाराष्ट्रात 2,58,108 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 11,34,555 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 37,758 रुग्णांचा मृत्यू

? हाथरस प्रकरण: हाथरस येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सीबीआय चौकशीचे दिले आदेश

? मराठा आरक्षण प्रश्नावर न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आज रविवारी कोल्हापुरात होणार न्यायिक परिषद, सात जिल्ह्यातील वकिलांसह विविध प्रतिनिधी राहणार उपस्थित

?️ हाथरस’सारखी प्रकरणे महाराष्ट्रात झाली तेव्हा संजय राऊतांनी तोंड का उघडले नाही, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांचा सवाल

✌️ बिहार निवडणूक: महाआघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; आरजेडी 145 आणि कॉंग्रेस 62 जागांवर निवडणूक लढवेल, अधिकृत घोषणा लवकरच

? मुंबई लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रस्ताव नाही, रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची माहिती

? ट्रम्प यांच्यावर रेमडेसीवीरचे उपचार;डोनाल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे

? औरंगाबाद: बेगमपुरा भागातील आसाराम बापू आश्रमाजवळ एका विहिरीत आढळला 35 वर्षीय महिलेचा मृतदेह; आत्महत्या केल्याची शक्यता

? दिल्ली कॅपिटल्सचा कोलकाता नाइट रायडर्सवर 18 धावांनी दणदणीत विजय; दिल्लीने दिले होते 229 धावांचे मोठे लक्ष्य

? अभिनेत्री प्रियांका चोप्राने लिहिलेले ‘अनफिनिश’ हे पुस्तक अवघ्या 12 तासांत ठरले अमेरिकेतील ‘बेस्ट सेलर’ पुस्तक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here