हेडलाईन्स, 27 जुलै 2021

626

✒️ पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; वीज, पाणी पुरवठा, रस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे निर्देश,पूरसंरक्षक भिंती, इशारा यंत्रणा, पुनर्वसन याला प्राधान्य

✒️ जेईई अ‌ॅडव्हान्स्ड परीक्षा 3 ऑक्टोबर 2021 रोजी होणार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून दिली माहिती

✒️ मीराबाईला चानूला मिळू शकते सुवर्णपदक: वेटलिफ्टिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या चीनी एथलीट होउवर डोपिंगचा संशय, सँपल-A मध्ये संशयानंतर सँपल-B साठी समन्स

✒️ महाराष्ट्रात 88,729 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 60,46,106 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,31,605 रुग्णांचा मृत्यू

✒️ पूरग्रस्त लोकांसाठी राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, खासदार, आमदार एक महिन्याचे वेतन देणार; पक्षाच्यावतीने आणखी काही मदत देता येईल का हे एक – दोन दिवसात जाहीर होणार – मंत्री नवाब मलिक

✒️ हिंगोली अन विदर्भात दुकाने फोडून धान्य पळवणारे तिघे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; एक झायलो कारसह 12 लाखांचा ऐवज जप्त

✒️ लसीकरणात महाराष्ट्राने गाठला आणखी एक विक्रमी टप्पा; लसचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या पोहचली एक कोटींवर, आतापर्यंत 3 कोटी 16 लाख नागरिकांना लसचा पहिला डोस

✒️ भारतात 3,92,696 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,06,13,938 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,21,414 रुग्णांचा मृत्यू

✒️ कर्जबुडव्या विजय माल्ल्या ब्रिटीश कोर्टाकडून दिवाळखोर घोषित, बँका पैसे वसूल करु शकणार; जुलै महिन्यात विजय मल्ल्याला कर्ज देणाऱ्या बँकांना शेअर्स विकून मिळाले 792.12 कोटी रुपये

✒️ भुईबावडा घाटात रस्त्यावर उभी भेग गेल्यामुळे पुढील सहा महिने ते एक वर्ष वाहतुकीसाठी हा घाट बंद राहणार; 5 ते 6 दिवसात करूळ घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार

✒️Tokyo Olympics: 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सौरभ चौधरी आणि मनु भाकरची जोडी पात्रतेसाठी पोहोचली दुसऱ्या टप्प्यात; सौरभच्या 296 आणि मनुच्या 286 धावा

✒️ शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती पुन्हा लांबणीवर; अधिसूचना काढण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत, राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने केली मान्य

✒️ पंकज त्रिपाठी आणि क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मिमी’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या 4 दिवस अगोदरच काल सायंकाळी ऑनलाईन लिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here