? राज्यातील पूरग्रस्त 7 जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना 27 जुलैपर्यंत जेईई (मुख्य) परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर जाता आले नाही, त्यांना आणखी एक संधी मिळण्याची शक्यता; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहीती
? कॅन्सरवरील आयुर्वेदिक औषधांना आंतरराष्ट्रीय पेटंट मिळण्याची चिन्हे, भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचा पुढाकार
? पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा 38 धावांनी विजय, टीम इंडियाच्या 165 धावांच्या आव्हानासमोर श्रीलंका 126 धावांवर ऑल आऊट
?सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी 55 फुटांपर्यंत पोहोचली, जिल्ह्यात दीड लाख पूरग्रस्तांचे स्थलांतर
? राज्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात 137 जणांचा बळी; 50 जण जखमी तर 73 जण अद्याप बेपत्ता
? तिरंदाजीमध्ये भारताने चौथ्या सेटमध्ये 55-54 असा विजय मिळवत पुढील फेरीत केला प्रवेश, भारतासमोर आता दक्षिण कोरियाचं आव्हान
? महाराष्ट्रात 94,985 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 60,35,029 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,31,552 रुग्णांचा मृत्यू
? मुख्यमंत्र्यांची चिपळूणमध्ये पाहणी: मुख्यमंत्री म्हणाले – आताच घोषणा करणार नाही; राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच नुकसान भरपाईची घोषणा
? भारतात 4,04,820 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 3,05,71,399 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,20,996 रुग्णांचा मृत्यू
? जळगाव : उपमहापाैर कुलभूषण पाटील यांच्या घरावर पूर्ववैमनस्यातून 4 ते 5 जणांनी गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद
? शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या जॉइंट अकाउंटमध्ये विदेशातून आला पैसा; ईडी मनी लॉन्ड्रिंगचा तपास करेल, PMLA आणि FEMA अंतर्गत समन्स बजावणार