- ??प्रचार सभांसाठी आणि रॅलींसाठी निवडणूक आयोगानं दिली पूर्ण सूट, राजकीय सभांना पूर्वीप्रमाणे 50 टक्के उपस्थितीची मर्यादा हटवली; देशातील कोरोनाबाधितांची घटती प्रकरणं पाहून निवडणूक आयोगाचा निर्णय
- ??टीम इंडियाला मोठा धक्का, गंभीर दुखापतीमुळे दीपक चहर संघाबाहेर; भारत आणि श्रीलंकेच्या टी-20 मालिकेला दि. 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार
- ??एसटी संपामुळे महामंडळाचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान कामगारांकडून वसूल करण्याचा महामंडळाचा कोणताही निर्णय नाही, कामगारांनी कामावर रुजू व्हावे; एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षकांची माहीती
- ?? युक्रेन-रशिया देशांच्या वादामुळे महागाई वाढण्याची शक्यता, क्रूड ऑईलने 95 डॉलर केले पार; निवडणूक निकालानंतर देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याचे संकेत
- ??लससक्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे राज्य सरकारकडून मंगळवारी उच्च न्यायालयात स्पष्टीकरण, आता 25 फेब्रुवारीला राज्य कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर होणार अंतिम निर्ण
- ?? इन्स्टाग्रामवर दादागिरीचे रिल्स बनवणाऱ्या उल्हासनगरच्या पाच जणांची थेट जेलमध्ये रवानगी, काही व्हिडिओमध्ये तरुणांच्या हातात बंदुका तर 307, 302 असेही शब्दप्रयोग
- ?? साईबाबांच्या पहाटच्या काकड आरती आणि रात्रीच्या शेजारतीत 1 मार्च पासून बदल, पहाटे 4 वाजेची काकड आरती पहाटे 5.15 वा. तर शेजारती रात्री 10.30 ऐवजी रात्री 10 वाजता होण
- ??देशातील 11 खासदारांना संसदरत्न पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व फौजिया खान, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, भाजपच्या खासदार हिना गावित या या 4 खासदारांचा समावेश
- ?? *Maharashtra Corona Update :* राज्यात मंगळवारी 1080 नव्या रुग्णांची भर, 2 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त; राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के