हेडलाईन्स, 21 मार्च 2022

405
  • ?? ‘कोविशिल्ड’ या लसीच्या दोन डोसमधले अंतर कमी करण्याचा निर्णय होण्याची शक्यता; NTAGI ची याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस
  • ?? रशिया vs युक्रेन: रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासोबत वाटाघाटीला तयार, पण जर हे अयशस्वी झाले तर याचा अर्थ तिसरे महायुद्ध होऊ शकते – व्लादिमीर झेलेन्स्की
  • ?? मनसेकडून शिवजयंती जल्लोषात साजरी होणार, आज राज ठाकरेंकडून शिवाजी पार्कमध्ये महाराजांच्या पुतळ्यावर हॅलीकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार, तर अमित ठाकरे शिवजयंतीसाठी शिवनेरीवर जाणार
  • ??केरळमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना: सुमारे 2 हजार प्रेक्षकांवर कोसळली स्टेडियमची गॅलरी, 200 जण जखमी, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
  • ?? महाराष्ट्रात काही भागात पावसाळी वातावरण, पुढील दोन दिवसांत सर्वत्र दिवसाच्या कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी घट होण्याची शक्यता – हवामान विभाग
  • ?? ISL Final : हैदराबाद फुटबॉल क्लबने पेनल्टी शूटआऊटच्या जोरावर कोरलं आयएसएल चषकावर नाव, केरळा ब्लास्टर्सचं विजयाचं स्वप्न भंगलं
  • ?? बिहारमध्ये मृत्यूचे तांडव! विषारी दारू प्यायल्याने 13 जणांचा मृत्यू, एका व्यक्तीची दृष्टीही गेली तर काहींना रुग्णालयात केलं दाखल
  • ?? भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचं रौप्य पदकावर समाधान, ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेचा अंतिम सामना 21-10, 21-15 अशा फरकाने गमावला
  • ??कोरोना अपडेट: मागील 24 तासांत (काल) राज्यात 113 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 1354 वर, 283 जण कोरोनामुक्तत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here