‘ही’ आहेत महाराष्ट्रातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज, इथे ऍडमिशन मिळालं म्हणजे लाईफ सेट !

    108

    इंजीनियरिंगला ऍडमिशन घेणार आहात ? पण कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावे हे सुचत नाहीये मग आजचा हा लेख तुमच्या कामाचा राहणार आहे. आज आपण महाराष्ट्रातील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती जाणून घेणार आहोत जिथे ऍडमिशन मिळाल्यास तुमची लाईफ पूर्णपणे सेट होणार आहे.

    Top Engineering Colleges : महाराष्ट्र राज्यबोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून सध्या सर्वत्र याच निकालाची चर्चा आहे आणि विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागला आणि दहावीचा निकाल हा 13 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला.

    यंदा दहावी आणि बारावी या दोन्ही वर्गामध्ये लाखो विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत आणि यातील काही विद्यार्थी आता इंजीनियरिंग करणार आहेत. बारावी सायन्स मध्ये उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत आणि आज आम्ही याच विद्यार्थ्यांसाठी आज एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

    Top Engineering Colleges

    आज आपण राज्यातील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजेसची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हीही इंजीनियरिंग ला ऍडमिशन घेणार असाल आणि त्यासाठी राज्यातील टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख फारच कामाचा ठरणार आहे.

    महाराष्ट्रातील टॉप 5 इंजिनिअरिंग कॉलेज कोणती ?भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (IIT Mumbai) :

    इंजीनियरिंगचा विषय निघाला आणि आयआयटीचे नाव आले नाही, असं होणं अशक्यच आहे. इंजीनियरिंग साठी विद्यार्थी आयआयटी ला सर्वाधिक प्राधान्य दाखवतात. आयआयटी मध्ये ऍडमिशन झाल्यास लाईफ सेट होते. देशभरातील विविध शहरांमध्ये आयआयटी आहेत. मुंबईत देखील आयआयटी आहे आणि हे राज्यातील एक प्रमुख इंजीनियरिंग कॉलेज आहे.

    ही महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील अग्रगण्य संस्था असून ती शिक्षण व संशोधन क्षेत्रात संपूर्ण जगभरात कीर्ती प्राप्त करीत आहे. या ठिकाणी देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इंजीनियरिंग ला ऍडमिशन घ्यायचे असेल तर आयआयटी मुंबई हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरणार आहे.

    DIAT पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ख्यातनामअसणाऱ्या पुण्यात असंख्य कॉलेजेस तुम्हाला पाहायला मिळतील. पुण्यातील Defence Institute of Advanced Technology (DIAT) हे कॉलेज मात्र या सर्व कॉलेजपेक्षा थोडे भिन्न आहे. या कॉलेजची ख्याती संपूर्ण देशभर पाहायला मिळते.

    या कॉलेजमध्ये देशातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि म्हणूनच जर तुम्हालाही इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल तर पुण्यातील हे कॉलेज तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकते.खरे तर ही शैक्षणिक संस्था संरक्षण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असून संरक्षण संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

    VNIT नागपूर : महाराष्ट्र राज्याची उपराजधानीनागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (VNIT) ही देशातील एक प्रमुख शैक्षणिक संस्था आहे. या शैक्षणिक संस्थेत हजारो विद्यार्थी शिक्षण घे आहेत. या संस्थेबाबत बोलायचं झालं तर ही शैक्षणिक संस्था 1960 मध्ये स्थापित झाली.

    ही शैक्षणिक संस्था देशातील प्रमुख राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थांपैकी एक आहे. या संस्थेला देशातील नामवंत अभियंता मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे नाव देण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे या संस्थेत ऍडमिशन व्हावे असे स्वप्न असते.

    ICT मुंबई : आयसीटी मुंबई ही संस्था देखील या यादीत येते. महाराष्ट्रातील टॉप पाच इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये या संस्थेचा सुद्धा समावेश होतो. ही संस्था रसायन व तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगत संशोधनासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शैक्षणिक संस्थेची स्थापना 1933 मध्ये करण्यात आली होती. या शैक्षणिक संस्थेची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त आहे.

    पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय : पुण्यातील अभियांत्रिकी विद्यालय महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि बेस्ट इंजीनियरिंग कॉलेज म्हणून संपूर्ण देशभर ख्यातनाम आहे. या ठिकाणी हजारो विद्यार्थी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत आणि जर तुम्हालाही इंजीनियरिंगला जायचे असेल तर हे कॉलेज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.

    या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे हे महाराष्ट्रातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. तसेच हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जुने अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते. या

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here