हिवाळ्यात सांधेदुखीने हैराण झालात, मग हे उपाय करुन पाहा..!

384

हिवाळा सुरु झाला, की सांधेदुखीचा त्रास होऊ लागतो. तापमानात होणारी घट व शरीरात पोषक तत्वांची कमतरता असल्याने सांधेदुखी डोके वर काढते. शरीरातील रक्ताभिसरण क्रिया मंद झाल्याने सांधेदुखीच्या तीव्र वेदना जाणवू लागतात..सांधेदुखीचे आणखी एक कारण म्हणजे, युरिक अ‌ॅसिड..! शरीरातील युरिक अ‌ॅसिडचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त झाल्यास सांधेदुखीचा त्रास होतो. सांधेदुखी कमी करण्यासाठी आहाराला महत्त्व आहेच, शिवाय इतर उपाय करायला हवेत. याबाबत जाणून घेऊ या.. *वजन कमी करा*अनेक रोगांचे मूळ म्हणजे लठ्ठपणा.. जास्त वजनामुळे सांध्यांवर ताण येतो..विशेषत: गुडघे, नितंब नि पायांच्या सांध्यावर जास्त दबाव असतो. त्यामुळे सांधेदुखी टाळण्यासाठी सर्वप्रथम वजन कमी करा. *पुरेसा व्यायाम*हिवाळ्यात रक्ताभिसरण क्रिया सुरु राहण्यासाठी रोज व्यायाम करणे गरजेचे आहे.. व्यायामामुळे वजन कमी होते. शिवाय सांध्याभोवतीचे स्नायू मजबूत होतात. *हॉट अ‍ॅण्ड कोल्ड थेरेपी*हॉट थेरपीमध्ये शरीराचा कडकपणा कमी करण्यासाठी गरम पाण्याने अंघोळ, गरम शॉवर किंवा इलेक्ट्रिक ब्लँकेटचा समावेश होतो. कोल्ड थेरपीमध्येत बर्फ पॅक किंवा गोठलेल्या भाज्या वेदनादायी भागात लावल्या जातात. *शरीराची मालिश*आरोग्यासाठी मसाज चांगला मानला जातो. सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठीही मसाज करावा, त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही, उलट अप्रत्यक्ष फायदेच होतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here