
महाराष्ट्रातील बहुआयामी गरीबी निर्देशांकानुसार तब्बल 14.9 टक्के म्हणजेच 26 लाख कुटुंबे वंचित असल्याची माहीती समोर आली आहे. गरिबीच्या टक्केवारीनुसार पुणे (5.29 टक्के) जिल्हा सर्वाधिक चांगला तर नंदुरबार (52.12 टक्के) जिल्हा पुण्याच्या तुलनेत 14 पटीने गरीब आहे.
नीती आयोगाच्या दस्तऐवजानुसार एमपीआय (मल्टी डायमेन्शनल पॉव्हर्टी इंडेक्स) दिलेले आहेत. औरंगाबाद 64, अमरावती 51, बुलडाणा 79, हिंगोली 119 तर अहमदनगरचा बहुआयामी गरीबी निर्देशांक 67 आहे. तर 100 च्या पुढे जळगाव (100), बीड (103), वाशिम (105), चंद्रपूर (108), परभणी (113), यवतमाळ (120), नाशिक (130), हिंगोली (133), जालना (140), नांदेड (143), धुळे (199), ठाणे (241), नंदुरबार (303).