हार्डवेअर दुकान व्यवसाईकाला गंडा घालणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक:

शिक्रापुर येथील हार्डवेअर दुकानदाराला सुमारे 1 लाख रू. किमतीचे हार्डवेअरचे मालाचा गंडा घालुन फसवणुक करून माल घेवुन जाण-या भामटयास संपुर्ण माल व साथीदारासह अटक करून गुन्हा उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा पुणे ग्रा.ची कारवाई केली आहे.

दि.07/10/2010 रोजी शिक्रापुर येथील शीवशक्ती हार्डवेअर अँड प्लाय दुकाणाचे मालक हितेश अशोककुमार प्रजापती, वय 22 वर्ष रा. शिक्रापुर ता.शिरूर जि.पुणे हे दुकाणामध्ये असताना एक अज्ञात इसमाने त्यांना फोन करून बांधकामासाठी साहीत्य लागणारे आहे असे म्हणुन पत्रे, अँगल, जाळी व इतर साहीत्य पाहिजे असल्याचे सांगुन तो माल वाडेगव्हाण ता.पारनेर जि. अहमदनगर येथे पाठवुन दया माल भेटल्यावर पैसे देतो असे सांगुन विश्वास संपदान करून दुकानदार यांनी दुकाणातील 97,200/- किमतीचा बांधकामासाठी लागणारे पत्रे, लोखंडी अॅगल, बार, चॅनल, जाळी पाठवुन दिले होते. जातेगाव अहमदनगर येथे अज्ञात आरोपींनी तो माल उतरवुन घेवुन पैसे शिरूरला देतो असे सांगुन फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणुक करून माल घेवुन निघुन गेले होते. त्यावरून शिक्रापुर पो.स्टे.गु.र.नं 632/2020 भा.द.वि. कलम 420, 406, 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता. माल घेवुन गेल्यानंतर फिर्यादीचा त्या अज्ञात व्यक्तीशी संपर्क होत नव्हता, सदरचा गुन्हा हा अज्ञात आरोपींनी केला होता.सदर गुन्हयाचा तपास .पो.नि.पद्माकर घनवट यांचे आदेशाने स्था.गु.अ.शाखा पुणे ग्रामीण यांचे पथकाकडुन समांतर तपास चालु होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत असताना पुणे अहमदनगर रोडचे सी.सी.टि.व्ही. फुटेज चेक करून, गुप्त बातमीदारांचे मार्फत बातमी काढुन व तांत्रीक विष्लेशन करून सदरचा गुन्हा हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार दिपक गणेश गुगळे, रा.माका ता.नेवासा जि.अहमदनगर याने केल्याबाबत माहीती मिळाली.

आज दि15/10/2020 रोजी सदरचा आरोपी रामलींग ता.शिरूर जि.पुणे या ठिकाणी येणार असल्याची बातमी मिळाल्याने त्यास ताब्यात घेवुन तपास करता त्याचे नाव दिपक गणेश गुगळे , वय 20 वर्षे रा. माका ता.नेवासा जि. अहमदनगर असे सांगुन त्याने सदर गुन्हयातील मुद्देमाल त्याचा मित्र शाहदेव म्हस्के रा. सदर याचे मदतीने करून त्याला माल दिल्याचेसांगुन आरोपी शाहदेव उर्फ शाहु दिलीप म्हस्के, वय 25 वर्ष, रा. सदर यास देखील ताब्यात घेवुन त्यांचेकडुन गुन्हयातील हार्डवेअरचा माल 97,200 रु आणि गुन्हयात वापरलेला 407 टॅम्पो न. एम एच 16 क्यु 2813 मिळुन आलेला असुन. सदर आरोपींची वैदयकीय तपासणी करून पुढील कारवाई करीता शिक्रापुर पो.स्टे. हजर केले आहे.

यातील आरोपी यांनी अशाच प्रकारे शिरूर, अहमदनगर मार्केट यार्ड, पाईपलाईन रोड, अहमदनगर अशा वेगवेगळया ठिकाणी हार्डवेअर पत्रे विक्रेते, पेंट विक्रेते, फर्निचर विक्रेते, तेलाचेडबे विक्रेते, भुसापेंड विक्रेते यांचेकडुन देखील अशाच प्रकारे विक्रेत्याची फसवणुक करून माल घेवुन गेलेचे सांगीतले आहे.

यात आरोपी दिपक गणेश गुगळे याचेवर पो.स्टे. गु.र.न214/2018 भा.द.वि. कलम 395 आर्म ऍक्ट 3, 25 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कारवाई अभिनव देशमुख सो,पोलीस अधीक्षक पुणे ग्रा.मिलींद मोहीते साो.अपर पोलीस अधीक्षक बारामती यांचे मार्गदशनाखाली पद्माकर घनवट, व.पोलीस निरीक्षक स्था.गु.अ.शाखा पुणे ग्रा. व पथकामधील कर्मचारी राम धोंडगे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर सहा.फौजदार दयानंद लिम्हण सहा.फौजदार उमाकांत कुंजिर , पोलीस हवालदार जनार्धन शेळके, पोलीस नाईक एम.आय.मोमीन, पोलीस नाईक राजापुरे, यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here