
हाथरस मध्ये सामुहिक बलात्कार प्रकरणी दोषींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी महिला विभाग जमाअत ए ईस्लामि हिंद नांदेड च्या वतीने करण्यात आली.
नांदेड (५ ऑक्टोबर)उत्तर प्रदेशच्या हाथरस गावामध्ये वाल्मिकी समाजातील मागासवर्गीय मुलीवर 14 सप्टेंबर ला काही नराधमांनी सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केली.बलात्कार करणाऱ्यांना त्वरित फाशी देण्यात यावी,आणि पीडितेच्या परिवाराची मदत करण्यात यावी अशी मागणी महिला विभाग जमाअत ए ईस्लामि हिंद नांदेड च्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांना करण्यात आली.
श्रीमती मलेका फिरदोस व श्रीमती आयेशा पठाण ह्यांनी मिडीयाला बोलतांना सांगितले की उत्तर प्रादेशा मध्ये महिला वरील अत्याचाराच्या गुन्ह्यात दिवसे दिवस वाढ होत आहे ज्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ऐका गरीब कुटुंबातील मुलीवर सामुहिक बलात्कार व हत्या आहे.
एकीकडे सरकार बेटी बचाव बेटी पढाव चा नारा देत आहे आणि दुसरी कडे मुलींवरील बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. उत्तरप्रदेशात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती खालावली आहे.दोषींवर कठोर कारवाई करण्यात सरकार कमी पडत आहे.
महिला विभागाने मिडिया ला मुलाखत दिली तसेच नांदेड च्या जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन ही देण्यात आले.ह्या प्रसंगी श्रीमती मलेका फिरदौस,श्रीमती आयेशा पठाण, श्रीमती डॉ.नसरीन,श्रीमती तहेसिन फातेमा,श्रीमती फरनाज़,श्रीमती तबस्सुम,श्रीमती अहेमदी बेगम उपस्थित होते.
*♦️महिला विभाग जमाअत ए ईस्लामि हिंद नांदेड♦️*