
गुरुग्राममध्ये शनिवारी एका 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन नराधमांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. बलजीत असे एका आरोपीचे नाव आहे.
ही महिला तिच्या बहिणीसोबत दिल्लीत राहते आणि ती मूळची मध्य प्रदेशची आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महिलेला एका आरोपीने नोकरीच्या मुलाखतीच्या बहाण्याने गुरुग्राममधील त्याच्या फ्लॅटवर बोलावले होते. आरोपी तिची मैत्रीण निक्कीच्या माध्यमातून बलजीतच्या संपर्कात आला.
बलजीतने महिलेला नोकरी देण्याचे आश्वासन दिले. आरोपीने बलात्कार पीडितेला मुलाखतीसाठी गुरुग्रामच्या सेक्टर 110 येथील इंडिया बुल सोसायटीच्या फ्लॅटवर बोलावले. महिलेने पोलिसांना सांगितले की, बलजीतने शामक असलेले कोल्ड ड्रिंक दिले.
काही वेळाने बलजीतचा मित्रही फ्लॅटवर पोहोचला. महिलेला चक्कर आल्यासारखे वाटले. दोघांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. महिलेने पोलिसात जाऊन दोन्ही आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376-D आणि 328 अंतर्गत दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवला.
या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला.
आणखी एका धक्कादायक घटनेत, हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका 14 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तीन अल्पवयीन मुलांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी सरकारी शाळेत आठवीच्या वर्गात शिकते. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.


