
हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात मंगळवारी तीन मजली तांदूळ गिरणीची इमारत कोसळून चार जण ठार तर २० जण जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यातील तरोरी शहरातील शिवशक्ती राईस मिलमध्ये पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. सुमारे 200 मजूर झोपलेले असताना, इमारतीच्या वरच्या मजल्यावरील छत कोसळले, परिणामी चार स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला.
कर्नालचे पोलिस अधीक्षक शशांक कुमार सावन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या चार मृतांची नावे चंदन, अवदेश, संजय आणि पंकज अशी आहेत. ते स्थलांतरित कामगार होते आणि ते बिहारमधील समस्तीपूरचे रहिवासी होते.
जखमींना तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अनेक कामगार अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत असून अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका यांच्या सहभागासह बचाव कार्य सध्या सुरू आहे.
घटनास्थळी शेकडो मजूर जमा झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकांना पाचारण करण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या घटनेबाबत अजून माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.