हरितगृह, शेडनेटगृह नोंदणीसाठी आवाहन
अहमदनगर: सन 2021-22 साठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान संरक्षित शेती घटकांतर्गत हरितगृह/शेडनेटगृह/ केबल ॲण्ड पोस्ट प्रकारचे शेडनेटगृह करणा-या कंपन्या, सेवापुरवठादारांची नोंदणी प्रक्रिया राज्यस्तरावर राबविण्यात येत आहे. तरी हरितगृह, शेडनेटगृह, केबल ॲण्ड पोस्ट प्रकराचे शेडनेटगृह उभारणी करणा-या इच्छुक कंपन्या, सेवापुरवठादार यांनी विहित अटी व शर्तीच्या अनुषंगाने नोंदणी करीताचे प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, साखर संकुल, पुणे-5 या कार्यालयास दिनांक 10 ऑगस्ट, 2021 अखेर सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित नजीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यस्तरीय नोंदणी राबविणे बाबतची कार्यपध्दती, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे इत्यादीबाबतचा सविस्तर तपशिल www.mahanhm.in व http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.