‘हनी ट्रॅप’…! अहिल्यानगरचं कोण अडकलंय यात? तृप्ती देसाई जरा खुलासेवार सांगाल का? नाही म्हणजे हा तुमचा फुसका बार तर निघणार नाही ना?

    137

    थोर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मध्यंतरी नाशिकचं ‘हनी ट्रॅप’ आणि अहिल्यानगरचं ‘कनेक्शन’ एक अशी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केली होती. त्या पोस्टमुळे अहिल्यानगर शहर आणि परिसरात संशयाचं वातावरण तयार झालं आहे. प्रत्येक जण एकमेकांकडे संशयाने पाहत आहे. या पार्श्वभूमीवर काही प्रश्न विचारले जाताहेत. ते प्रश्न असे, की ‘हनी ट्रॅप’…! अहिल्यानगरचं कोण अडकलंय यात? तृप्ती देसाई जरा खुलासेवार सांगाल का? नाही म्हणजे हा तुमचा फुसका बार तर निघणार नाही ना?

    सुंदर दिसणाऱ्या एखाद्या महिलेनं पुरुषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून कामवासनेच्या ज्वरात त्याला नखशिकांत बुडवून ‘नको त्या’ अवस्थेतले त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ‘ब्लॅकमेल’ करत त्याची प्रचंड प्रमाणात आर्थिक लूट करायची, या साऱ्या प्रकाराला ‘हनी ट्रॅप’ असं नाव देण्यात आलं आहे. नाशिकमध्ये असं प्रकरण जोरात सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र नाशिकच्या या ‘हनी ट्रॅप’चं ‘कनेक्शन’ अहिल्यानगरला असल्याचा धक्कादायक खुलासा तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

    यांच्या सोशल मिडियावरच्या त्या खुलाशानंतर प्रतिष्ठित आणि उच्चभ्रू समाजात वावरणाऱ्यांच्या इथल्या अनेकांच्या मनात कमालीचा संशय दाटून आला आहे. अहिल्यानगर शहरातला प्रत्येक जण एकमेकांकडे कदाचित ‘हा तर ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला नाही ना’, अशा संशयाने पाहत आहे. घरी गेल्यानंतर बायको नवऱ्याकडे संशयाने पाहत आहे. मुलगी आणि मुलगा बापाकडे संशयाने पाहत आहे. एवढंच नाही तर या शहराबाहेर राहणारा जावई हादेखील आपला सासरा तर ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला नाही ना, अशी विचारणा त्याच्या बायकोकडे करत आहे. अशा या संशयाच्या वातावरणात तृप्ती देसाई यांनी या संदर्भातला खुलासा लवकरात लवकर करण्याची नितांत आवश्यकता आहे.

    अहिल्यानगरच्या नक्की कोणाकोणाचा नाशिकच्या या ‘हनी ट्रॅप’मध्ये बळी गेला आहे, कोणाकोणाची किती लाखांची आर्थिक लूट करण्यात आली आहे, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याची नैतिक जबाबदारी खरं तर तृप्ती देसाई यांच्यावर आहे. या प्रश्नांची उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत तर विनाकारण अहिल्यानगर शहर आणि या शहरात राहणाऱ्या नागरिकांवर बदनामीचे ‘शिंतोडे’ उडविल्याचं पातक तृप्ती देसाई यांच्या माथी पडेल.364अहिल्यानंतर किंवा पूर्वीचं अहमदनगर या शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे.पाचशे वर्षांपूर्वीचे हे शहर असून खरं तर त्यागाची, शूरवीरांची, संत मंहंतांची ही भूमी आहे. या शहरात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहताहेत. या शहराची बाजारपेठ एकेकाळी कैरो बगदाद या शहरांतल्या बाजारपेठांशी स्पर्धा करायची, असं म्हटलं जातंय.

    आजही या शहरात अनेक ठिकाणचे ग्राहक खरेदीनिमित्त येताहेत. या शहराला श्री विशाल गणपतीचा वरदहस्त लाभला आहे. अवतार मेहेर बाबांचा या शहराला पावन पदस्पर्श झालेला आहे. राष्ट्र संत आनंदऋषिजी महाराज यांचं समाधी स्थळ याच शहरात आहे.अशा भक्तिमय वातावरणातला सुजाण नागरिक तृप्ती देसाई आपण नगरकरांची माफी मागाच…!

    सवंग लोकप्रियतेसाठी एखादं भडक वक्तव्य करून लोकांचं आपल्याकडे लक्ष आकर्षित करून घेणारे समाजात आज काल पावलोपावली दिसताहेत. मात्र सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या अशा लोकांसारख्या नक्कीच नाहीत. त्यांचं व्यक्तिमत्व जबाबदार आणि सजग नागरिकाचं असून वकिलीच्या माध्यमातून त्या न्यायदानाच्या पवित्र कार्यात सातत्याने सहभागी असतात. त्यामुळे तृप्ती देसाई यांच्याकडून अशा भडक वक्तव्याची अपेक्षा कोणताच नगरकर करणार नाही. परंतू दुर्दैवानं हे असं झालं आहे. त्यामुळे खरोखरच नाशिकच्या ‘हनी ट्रॅप’शी अहिल्यानगरचं ‘कनेक्शन’ असेल तर तृप्ती देसाई यांनी ते आम जनतेसमोर आणावं. पुराव्याशिवाय विनाकारण अहिल्यानगरची बदनामी केल्याबद्दल तृप्ती देसाई यांनी नगरकरांची माफी मागावीच, असं खुलं आवाहन नगरकरांच्यावतीनं आम्ही (लोकपत डिजिटल मीडिया अहिल्यानगर) तृप्ती देसाई यांना करत आहोत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here