
नगर : बॉलिवूडमधील आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. आता नवाजुद्दीनचा (Nawazuddin Siddiqui) हड्डी (Haddi) हा ओटीटीवर चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटामधील नवाजुद्दीनच्या भूमिकेचं भरभरून कौतुक होत आहे.
‘हड्डी’ हा सिनेमा ट्रान्सजेंडरच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे. या सिनेमात नवाजुद्दीने ८० खऱ्या ट्रान्सजेंडरसोबत काम केलं आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अक्षय अजय शर्मा यांनी सांभाळली आहे. झी स्टूडियोज आणि आनंदिता स्टूडियोजच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. काही नेटकऱ्यांनी ट्वीट शेअर करुन हड्डी चित्रपटामधील नवाजुद्दीनच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे.
एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, ‘हड्डी, अत्याचार आणि हिंसाचारात जन्मलेला आणि वाढलेल्या हड्डीची गोष्ट. नवाजुद्दीन सिद्दीकीने हड्डी या ट्रान्सजेंडरची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीनं साकारली आहे. चित्रपटात हड्डी हा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे.’
हड्डी या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबतच इला अरुण, अनुराग कश्यप, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पाहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले आहे. लवकरच नवाजुद्दीन हा ‘नूरानी चेहरा’ आणि ‘अदभूत’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



