हद्दपार(तडीपार) आदेशास स्तगिती; विभागीय आयुक्त, नाशिक.

*हद्दपार(तडीपार) आदेशास स्तागिथी

*नाशिक- अहमदनगर येथील हद्दपार असलेल्या स्वप्नील सुनील पारधे यास महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदी नुसार पोलिस अधीक्षक, अहमदनगर यांनी त्यांचेकडील दिनांक २३/११/२०२१ च्या आदेशद्वारे अहमदनगर जिल्ह्यातून १८ महिने कालावधी करिता हद्दपार केले होते.

सदर आदेशास आव्हान देण्या करीता स्वप्नील पारधॆ ने दिनांक ०८/१२/२०२१ रोजी ॲड. आर एन बेग तर्फे विभागीय आयुक्त, नाशिक यांचेकडे अपील दाखल करून सदर अपील मध्ये अव्हानीत (हद्दपार) आदेशास स्तगिथी मिळण्याकरिता स्तगिथी अर्ज दाखल केलेला होता.

सदर स्तगिथी अर्जावर दिनांक २८/१२/२०२१ रोजी सुनावणी होवुन मा.विभागीय आयुक्त साहेब,नाशिक यांनी हद्दपार(तडीपार) आदेशास स्तगिथी देण्याची अपिलार्थी ची विनंती मान्य केली आहे.

या प्रकरणी अपिलार्थी स्वप्नील च्या वतीने ॲड. आर एन बेग, ॲड. आर आर बेग व ॲड. ए आर बेग यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here