स्व. आ. राजीव राजळे यांच्या जयंतीनिमित्त शेवगाव मध्ये “राजीव बुक फेस्ट” चे आयोजन उद्घाटनासाठी “यु-ट्युब फ्रेम प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर परभणी” आणि आमदार सत्यजित तांबे उपस्थित राहणार

    175

    { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755

    शेवगाव प्रतिनिधी ~ 04 डिसेंबर 2023
    याबाबत सविस्तर वृत्त असे की स्वर्गीय माजी आमदार राजू जी राजळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ गेल्या सहा वर्षापासून माजी नगरसेवक रिंकू उर्फ महेश फलके यांच्या संकल्पनेतून चला वाचन संस्कृती टिकवूया या उद्देशाने स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे यांचे जयंती निमित्त राजीव राजळे मित्र मंडळ शेवगाव यांनी दरवर्षीप्रमाणे राजीव बुक फेस्ट 2023 चे आयोजन स्वराज मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय आमदार राजीव राजळे यांची जयंती 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता होणार असून दिनांक 5,6 व 7 डिसेंबर रोजी पुस्तक प्रदर्शन पुस्तक प्रेमींसाठी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत खुले असणार आहे.
    आमदार सत्यजितदादा तांबे, विधान परिषद सदस्य, यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी चे संचालक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक विठ्ठल कांगणे सर हे असणार असून यांचे मार्गदर्शन यावेळी कार्यक्रमासाठी असेल अशी माहिती राजीव राजळे मित्र मंडळाचे सदस्य नगरसेवक महेश फलके यांनी दिली.
    स्वर्गीय आमदार राजीवजी राजळे पुस्तक प्रेमी होते, वाचनाच्या आवडीने अभ्यासू आमदार म्हणून ते सर्व परिचित होते, यातून त्यांना उत्कृष्ट संसद पटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यामुळे वाचाल तर वाचाल यातून वाचनाचे महत्त्व आपल्याला लक्षात येते, वाचन मोठी शक्ती असून ज्याप्रमाणे शरीराच्या वाढीसाठी माणसाला अन्नाची गरज असते त्याचप्रमाणे मनाचे आणि मेंदूच्या मशागतीसाठी वाचन गरजेचे आहे, वाचताने ज्ञानाच्या कक्षा वृंदावतात, विचारांमध्ये परिपकवता येते वैचारिक उंची वाढण्यास मदत होऊन, वाचनाने व्यक्तिमत्त्वाला तेच आणि सूर्यासारखी झळाली प्राप्त होते. वाचनाबद्दल सकारात्मकता वाढावी या उद्देशाने पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे नगरसेवक महेश फलके यांनी सांगितले

    ताजा कलम

    माजी नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते महेश उर्फ रिंकू फलके हे वर्षभर सीड बँक विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण अधिकाऱ्यांचे सत्कार आणि मार्गदर्शन पुस्तक प्रदर्शन महिला मुलं आणि बालकांना प्रोत्साहन मिळतील अशा विविध स्पर्धा वर्षभर आयोजित करीत असतात याला खूप मोठा प्रतिसाद शेवगाव ची जनता देत असते

    अविनाश देशमुख शेवगांव
    सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार
    [

    अधिवेशनात अहमदनगर जिल्ह्यातील या प्रश्नांची उत्तरे मिळतील का?.. लोकमतचे रविवारचे मुद्द्याला धरुन…
    Lokmat ePaper – http://epaper.lokmat.com/articlepage.php?articleid=LOK_HANG_20231203_4_1

    शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूल 1985 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 38 वर्षानंतर भरवला शाळेत “स्नेहसंमेलन” आणि “कृतज्ञता सोहळा”

    { अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755
    याबाबत सविस्तर वृत्त असे की बाळासाहेब भारदे स्कूलच्या 1985 च्या एस.एस.सी. च्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल 38 वर्षानंतर काल दिनांक 3 डिसेंबर रविवारी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले सध्याचे पद प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून एक दिवसासाठी लहान मूल होऊन प्रत्यक्ष वर्गात जाऊन आपले माजी शिक्षक माजी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनात आणि सहवासात एक दिवस घालविला आपल्या जुन्या बेंचवर बसून आपल्या शालेय कारकिर्दीतील जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी ऍड. विवेक नाईक श्री. मिलिंद काटे श्री. कचरू दुबे श्री राजेंद्र मुळे श्री. सचिन ढुमणे सराफ व्यावसायिक रवींद्र डहाळे श्री. रामेश्वर जाजू पंडित सोनटक्के विजय रणमले यांच्यासह सुमारे 35 विद्यार्थी उपस्थित होते माझी प्राचार्य एस व्ही उर्फ सुधाकर कुलकर्णी शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष श्री हरीश भारदे माजी प्राचार्य रमेश भारदे माजी ग्रंथपाल रागिनी भारदे देशपांडे सर एकनाथ शिरसाठ सर रमेश पोरवाल कचरुलाल सारडा सर आजी प्राचार्य सरोदे सर यांनी व्यासपीठ उपलब्ध करून सहकार्य केले सर आदींचा यथोचित सन्मान करून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा करून दिला सकाळी नऊ वाजता एकत्र जमलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सायंकाळ कधी झाली हे कळालेच नाही दुपारी तीन नंतर रवींद्र डहाळे यांच्या फार्म हाऊस वर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला तब्बल 38 वर्षानंतर आपल्या व्यस्त झालेल्या जीवनातून आपली मुलं संसार नोकरी व्यवसाय यांचा विसर पडला होता लहानपण देगा देवा या उक्तीप्रमाणे दिवसभर स्वच्छंद आनंदाने हसत खेळत आणि बागडत आपल्या आठवणींची शिदोरी आपल्या सोबत घेऊन जीवनाच्या रहाटगाडग्यात पुन्हा प्रवेश करते झाले

    ताजा कलम

    बाळासाहेब भारदे स्कूल पूर्वाश्रमीचे शेवगाव इंग्लिश स्कूल या नावाने प्रसिद्ध होते शाळेच्या सुमारे पन्नास वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत 1967 ते 2010 पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी वेळोवेळी स्नेहसंमेलन रिबॉंडिंग सवंगडी लय भारी री युनियन माजी विद्यार्थी मेळावा स्नेहमीलन आदिनावांनी एकत्र येऊन आपली शाळा गुरुजन वर्ग बंधू भगिनी याबद्दल कायमच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे

    अविनाश देशमुख शेवगांव
    सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here