महाराष्ट्रात ‘इतक्या’ गावांना होणार फायदा
ग्रामीण भारतात बदल करण्याच्या हेतूने आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘स्वामित्व योजना’ लाँच करणार आहे. या योजनेत नागरिकांना त्यांच्या संपत्तीच्या मालकीचं कार्ड दिलं जाणार आहे.
आज सकाळी 11 च्या सुमारास या योजनेची सुरूवात होणार आहे. हा दिवस ग्रामीण भागातल्या जनतेसाठी ऐतिहासिक राहणार असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.
‘हा’ आहे फायदा-
आज जवळपास एक लाख भू-संपत्ती मालकांना आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही लिंक मिळणार आहे. जे ‘संपत्ती कार्ड’ डाऊनलोड करू शकतात.
L या योजनेत दिल्या जाणाऱ्या संपत्तीच्या मालकीच्या कार्डमुळे बँकेतून कर्ज घेणं किंवा इतर कामांसाठी त्या कार्डचा उपयोग केला जाऊ शकतो.
‘या’ 6 राज्याच्या 763 गावांना मिळणार कार्ड-
▪️ महाराष्ट्र-100 गावे
▪️ उत्तर प्रदेश- 346 गावे
▪️ हरियाणा- 221 गावे
▪️ मध्यप्रदेश- 44 गावे
▪️ उत्तराखंड- 50 गावे
▪️ कर्नाटक- 2 गावे







