पुणे : स्वागरगेटजवळ एसटी बसचा ब्रेक फेल; अनेक वाहनांना दिली धडक, सुदैवाने जिवीतहानी नाहीकाही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पुण्यातील स्वारगेट येथील शंकर महाराज पुलावर राज्य परिवहन मंडळाच्या बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असली तरी सुदैवाने जिवितहानी झालेली नाही.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास शंकर महाराज पुलावर सातारा ते स्वारगेट मार्गावरील एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडली. ब्रेक फेल झाल्याने या बसने सात ते आठ वाहनांना धडक दिली. यामध्ये काही नागरिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेमुळे स्वागरगेटमधील शंकर महाराज पुलाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने,नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे लागले. या प्रकरणाचा महामंडळाकडून तपास केला जाणार असल्याचं सांगितलं जातंय.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
विक्री करण्याचे उद्देशाने एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस बेकायदशिररित्या कब्जात बाळगणरा आरोपीला...
अहमदनगर - ३० जानेवारी रोजी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्याकडून माहिती मिळाली कि एक इसम हा...
भारताने कॅनडासोबत ब्रॅम्प्टन मंदिराचे विद्रुपीकरण केले
भारताने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि कॅनडासोबत शीख फुटीरतावाद्यांचे प्रश्न उचलून धरले असताना, लंडन आणि ओटावा भाषण स्वातंत्र्याच्या...
सुप्रीम कोर्टाने खासदार, आमदारांवरील फौजदारी खटला जलदगतीने चालवावा
सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी विधानसभा आणि संसदेच्या सदस्यांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांचा निपटारा जलद केला, देशभरातील उच्च न्यायालयांना अशा खटल्यांवर...
सिव्हील रुग्णालय जळीतकांड प्रकरण : चौघींना न्यायालयीन कोठडी
अहमदनगर : सिव्हील रूग्णालयातील जळीतकांड प्रकरणी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक करण्यात आली आहे. या चौघींची दोन दिवसांची पोलिस कोठडी...





