
स्वच्छ भारत अभियान शेवगाव तहसील कार्यलय शेवगाब पासून कोसो दुर वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव चे तहसीलदारांना निवेदन
{ अविनाश देशमुख शेवगाव }
9960051755
शेवगाव तहसील कार्यालयाच्या मध्यवर्ती इमारतीमध्ये ठीक ठिकाणी पान, मावा, गुटखा, तंबाखू युक्त सुपारी, खाऊन त्याच्या पिचकाऱ्या मारल्याने अनेक ठिकाणी इमारतीचे विद्रूपीकरण होत आहे पिण्याचे पाणी सार्वजनिक स्वच्छतागृह कार्यालयाच्या अनेक ठिकाणी भिंतीची दुर्दशा सुरू असल्याचे चित्र जागोजागी पाहण्यास मिळत आहे तहसीलदार साहेब यांच्या कक्षाच्या मागील बाजूस मागील दर्शनी भागात झाडे झुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे एकंदरीत संबंधितांचे पुरेसे लक्ष नसल्याने या लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या प्रशस्त व टूमदार इमारतीची दुर्दशा सुरू असल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांबरोबरच तालुक्याच्या विविध भागातून आपले काम घेऊन आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आल्याने तहसीलदार साहेब यांच्यासह संबंधितांनी इमारतीची योग्य साफसफाई करून घेण्याची व त्यानंतर इमारतीमध्ये घाण करणारा मग तो कोणीही असो त्याच्यावर कायदेशीर कारवाईचा बडगा उघडण्याची मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव शहर अध्यक्ष प्रीतम (पप्पू) गर्जे यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्व संबंधितांना दिली असून याबाबत तातडीने कार्यवाही झाली नाही तर प्रसंगी जनआंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा निर्धार तालुका अध्यक्ष प्यारेलाल शेख व प्रितम गर्जे यांनी जाहीर केला आहे केंद्र व राज्य शासनाने सार्वजनिक स्वच्छता व्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले असून या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी ग्राम स्वच्छता अभियान हा उपक्रम गेल्या काही वर्षापासून सुरू केला असून शासनाच्या या उपक्रमास सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे शेवगाव शहरातील अमरापूर पाथर्डी हमरस्त्यावर तहसील कार्यालयाची प्रशस्त इमारत कार्यरत असून या ठिकाणी तहसील कार्यालय बरोबरच तालुका कृषी विभाग सहाय्यक निबंधक दुय्यम निबंधक यांच्यासह तलाठी सेतू असे विविध शासकीय कार्यालयाचे कामकाज एकाच छताखाली गेल्या काही वर्षापासून सुरू आहे मात्र तहसील कार्यालयाच्या तुमदार इमारती मध्ये विविध ठिकाणी दर्शनी भागातील भिंतीवर पान तंबाखूच्या पिचकारी मारल्याने या इमारतीच्या विद्रूपीकरणाचे काम सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे तसेच पिण्याचे पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या परिसराची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सार्वजनिक स्वच्छतागृहाची मोडतोड झाल्याने त्याचा उग्र वास परिसरात पसरून अनेकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी आहे त्यामुळे शेवगाव शहरासह तालुक्यात शासनाचे स्वच्छता अभियान जेव्हा केव्हा यशस्वी होईल ते हो मात्र इमारतीची होणारी दूरदशा थांबविण्याबाबत येथे नव्याने हजर झालेले कर्तव्यदक्ष तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी लक्ष घालून लोकांची गैरसोय थांबवण्याची मागणी करणारे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्यारेलाल शेख व प्रीतम गर्जे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सर्व संबंधितांकडे दिले असून याबाबत ताबडतोबिनी कार्यवाही झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसंगी जनआंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा निर्धार प्यारेलाल शेख व प्रीतम गर्जे यांनी जाहीर केला आहे या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी प्रांताधिकारी यांच्यासह सर्व संबंधितांना दिले आहेत
ताजा कलम
गेल्या आठवड्यात शाशन आपल्या दारी मोठ्या थाटात संपन्न झाला पण “स्वच्छता शासनाच्या दारी केव्हा येणार” काही महसुलाचे कर्मचारीच कार्यालयाच्या भिंती रंगवण्यात बिझी आहेत “असं म्हणतात सहा सहा शिपाई आहेत” पण साहेब कोण आणि शिपाई कोण काही काळत नाही पूर्वी पांढरे स्वच्छ कपडे घातलेला तहसीलचा शिपाई असे आता तहसील कार्यालयात शिपाई ओळखुन दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा स्पर्धा भरवायला काही हरकत नाही
अविनाश देशमुख शेवगाव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार







