
टीम इंडियाची उपकॅप्टन स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न अखेर मोडलं आहे. स्मृतीने स्वतः माहिती देत याबाबत घोषणा केली आहे. स्मृतीने पोस्ट करत म्हटलं आहे की, गेल्या काही ऑठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी. पलाश मुच्छलनेही पोस्ट केली आहे.
आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. माझ्यासाठी तै नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपदं जिंकणं हेच आहे. पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर राहणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या पा व्यांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.
पलाश मुच्छलने सुद्धा लग्न मोडल्याची माहिती दिलीदरम्यान, स्मृतीने इन्स्टा स्टोरीवरून लग्न मोडल्याची माहिती दिल्यानंतर पलाश मुच्छलने सुद्धा इन्स्टा स्टोरी पोस्ट करत लग्न रद्द कैल्याची माहिती दिली आहे. पलश मुच्छलने म्हटलं आहे की, मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरं जाईन.




