
दिल्ली ते हैदराबाद स्पाईसजेटच्या फ्लाइटमधील दोन प्रवाशांना ‘अनियमित’ वर्तनामुळे उतरवण्यात आले. या घटनेचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक प्रवासी केबिन क्रूवर ओरडताना दिसत आहे.
एअरलाइनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एका प्रवाशाने केबिन क्रूचा ‘छळ’ केला, त्यानंतर त्याचा सहप्रवासी आणि त्याला विमानातून उतरवण्यात आले. त्यानंतर दोन्ही प्रवाशांना सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
“२३ जानेवारी २०२३ रोजी, स्पाइसजेटचे वेट-लीज्ड कोरेंडन विमान एसजी-८१३३ (दिल्ली-हैदराबाद) चालवणार होते. दिल्ली येथे बोर्डिंग दरम्यान, एका प्रवाशाने केबिन क्रूला त्रासदायक आणि अयोग्य रीतीने वागणूक दिली. क्रूने PIC आणि सुरक्षा कर्मचार्यांना याची माहिती दिली. सांगितलेला प्रवासी आणि सहप्रवासी, जे एकत्र प्रवास करत होते, त्यांना ऑफलोड करण्यात आले आणि सुरक्षा पथकाच्या ताब्यात देण्यात आले,” स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले.