स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी :जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना अटक.

:स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी.

अहमदनगर- जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत ‘त्या’ संबंधित पाच तडीपार गुन्हेगारांनी हद्दपार आदेशाचा भंग करुन ते अहमदनगर जिल्ह्यामध्येच बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना निर्दशनास आले.

त्या पाच गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, व प्रभारी नगर उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांना आदेश दिले होते.

त्या आदेशाप्रमाणे पोनि अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सोपान गोरे यांच्या अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक नेमून हद्दपार गुन्हेगारांची तपासणी करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अहमदनगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांची तपासणी दरम्यान, पोनि श्री कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, हद्दपार दिनेश रावसाहेब दातरंगे ( रा. तांगे गल्ली, नालेगाव, अहमदनगर), अतूल रावसाहेब दातरंगे, स्वप्नील अशोक ढवण ( रा. ढवण वस्ती, तपोवन रोड, अहमदनगर), सोनू उर्फ स्वप्नील राजेन्द्र दातरंगे ( रा. दातरंगे मळा, अहमदनगर), अषिश रघुविर गायकवाड (रा. शांतीपूर, तारकपूर, अहमदनगर) हे हद्दपार असताना लपूनछपून अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हद्दपार गुन्हेगारांचा शोध घेतला असता हद्दपार दिनेश रावसाहेब दातरंगे (वय ३२, रा. तांगे गल्ली, नालेगाव, अहमदनगर), अतुल रावसाहेब दातरंगे (वय २७), स्वप्नील अशोक ढवण (वय ३३ वर्षे, रा. ढवण वस्ती, तपोवन रोड, अहमदनगर), सोनू उर्फ स्वप्नील राजेन्द्र दातरंगे ( वय ३९, रा. दातरंगे मळा, अहमदनगर), अषिश रघुविर गायकवाड (रा. शांतीपूर, तारकपूर, अहमदनगर) हे मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.तर हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता दिनेश रावसाहेब दातरंगे, अतुल रावसाहेब दातरंगे यांना हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचेकडील आदेश क्रं. स्थागुशा/ हद्दपार / कोतवाली पो.स्टे./५५/४१३७/२०२१, अन्वये दि. ६ ऑगस्ट २०२१ पासून दोन वर्षाचे कालावधीसाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. स्वप्नील अशोक ढवण याला उपविभागीय दंडाधिकारी, नगर विभाग यांचेकडील आदेश हद्दपार प्रस्ताव क्रं. १६/२०२०, दि.१५ जानेवारी २०२० रोजीपासून एक वर्षाचे कालावधी करीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. सोनू उर्फ स्वप्नील राजेंद्र दातरंगे यास उपविभागीय दंडाधिकारी, नगर विभाग यांचेकडील हद्दपार प्रस्ताव क्रं. ९/ २०२०, दि. १० मार्च २०२१अन्वये रोजी पासून एक वर्षाचे कालावधीकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.

आशिष रघुविर गायकवाड यास उपविभागीय दंडाधिकारी, नगर विभाग यांचेकडील हद्दपार प्रस्ताव क्रं. १५/२०२० अन्वये दि. १५ जानेवारी २०२१ पासून एक वर्षाकरीता अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.या हद्दपार गुन्हेगारांनी हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द कोतवाली व तोफखाना पो.स्टे. येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

पुढील कार्यवाही कोतवाली व तोफखाना पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here