गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे बाळगणारा आरोपी अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर- अवैधरित्या शस्त्र बाळगणा-याविरुद्ध शोध मोहीमेत गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे बाळगणा-या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे. यश उर्फ चिक्या बाळासाहेब लांडगे (वय २२, रा. पुणतांबा ता. राहाता जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नावे आहे.नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांच्या आदेशाने श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे मॅडम, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील सपोनि गणेश इंगळे, पोहेकॉ विजयकुमार वेटेकर, पोना विशाल दळवी, पोना सुरेश माळी, पोना शंकर चौधरी, पोना दिपक शिंदे, पोकाॅ राहुल सोळंके व पोकॉ रणजीत जाधव आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेले माहिती अशी की, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी अवैद्धरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. याप्रमाणे अहमदनगर जिल्हयातील अवैध्दरित्या गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पोलीस पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाने अहमदनगर जिल्हयातील अवैध्दरित्या गावठी कट्टे (पिस्तुल) बाळगणाऱ्यांची माहिती घेत असतांना दि. ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटकेयांना गोपनिय माहीती मिळाली कि, गोंडेगाव ता. श्रीरामपूर येथील चितळीकडे जाणान्या पुलाजवळ एक सडपातळा बांध्याचा मुलगा देशी बनावटीचा कट्टा (अग्नीशस्त्र) व जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत आहे. ही माहिती मिळाल्याने श्री कटके यांनी पथकाला सूचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोंडेगाव, चितळी रोडचे पुलाजवळ (ता. श्रीरामपूर) जाऊन सापळा लावला. काही वेळेने त्या ठिकाणी एकजण एका बाजूस संशयीत नजरेने टेहाळणी करीत फिरत असतांना दिसला. माहितीनुसार इसम हाच असल्याची खात्री होताच त्यास घेराव घालून त्याला ताब्यात घेतले. त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव यश उर्फ चिक्या बाळासाहेब लांडगे (वय-२२ वर्षे रा. पुणतांबा ता. राहाता जि. अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याचे कब्जामध्ये ३० हजार रु. किमतीचे देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व ६०० रु. किमतीचे २ जिवंत काडतुसे असा ३० हजार ६०० रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला. मिळून आलेल्या गावटी कट्टा (पिस्तुल) व काडतुसेबाबत त्याचेकडे कसुन विचारपुस केली असता, त्याने गावठी कट्टा (पिस्तुल) व काडतुसे हे त्याचे साथीदाराकडून विकत घेतले असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याप्रमाणे त्याचे साथीदाराचा त्याचे राहते घरी शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ रणजीत जाधव यांनी सरकारतर्फे फिर्यादी होऊन फिर्याद दिली. श्री जाधव यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात ला गुरनं. ३४४/२०२९, भारतीय हत्यार कायदा कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील कारवाई श्रीरामपूर तालुका पोलिस करीत आहेत.