स्त्री शिक्षणाच्या कर्त्या धर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती!
अहमदनगर : प्रतिनिधि;
३ जानेवारी क्रांतीज्योतीसावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला “बालिका दिन” व “महिला मुक्ती दिन” असेही संबोधले जाते. सन २०२२ मधील ही सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती आहे.ज्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचे स्मरण होते, तिथेच ज्योतीबा फुले यांचे नाव घ्यायला विसरून चालणार नाही.
सावित्रीबाई फुले यांच्या नावापुढे “क्रांतीज्योती” हे विशेषण तर ज्योतीराव फुले यांच्या नावापुढे “क्रांतीसुर्य” हे विशेषण लागते. या विशेषणातूनच त्यांनी केलेल्या कित्येक कार्याची व्याप्ती व महत्व आपणास लक्षात येते.जेव्हा आपण त्यांच्या कार्याला ‘क्रांती’ च्या रुपात बघतो, तर असे कोणते कार्य त्यांनी केले, जे त्यांची ओळख “क्रांती” च्या रुपात आपणास दाखवून देतात हे आपण जाणले पाहिजे.
तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, अज्ञान, अंधश्रध्दा या विरूद्ध या दम्पत्याने संपूर्ण आयुष्यभर लढा दिला आणि सामाजिक क्रांती केली. फुले दाम्पत्याने तत्कालीन समाजातील शेतकरी, कष्टकरी, शोषीत, आणि स्त्रीयांच्या संदर्भातील अनेक समस्या जाणल्या, त्यांचे प्रश्न समाज व सरकारपुढे उभे केले, मांडले आणि स्वतः केलेल्या चांगल्या कार्यातून त्याचे उत्तर देखील त्यांनी मिळवले.
अशा अनेक समस्यांचे समाधान स्वतःच्या क्रांतीकारी कार्यातुन त्यांनी समाजापुढे मांडले, आणि आयुष्यभर समाजात ‘समता’ रुपी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या जोडप्यांनी महिलांचे शिक्षण, विधवा महिलांचा उद्धार, अनाथांना आश्रय असे असंख्य आणि मोजता न येणारे कार्य केले. त्यांच्या कार्याची पुण्याई व संविधानाने दिलेले समतेचे अधिकार, यामुळेच आजची ‘स्त्री’ शिक्षण घेऊन घराबाहेर निघू शकते आणि ताठ्मानेने सर्व गोष्टींचा सामना करू शकते आणि आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी दोन हात कर शकते.
ह्याच स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे.जिल्हा कौंटुबिक न्यायालय,अहमदनगर ,अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन आणि न्यायाधार संस्था अहमदनगर.यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती जिल्हा जिल्हा कौंटुबिक न्यायालय,अहमदनगर येथे साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा कौंटुबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश श्रीमती नेत्रा कंक साहेब यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी व्यासपीठावर मान्यवर सुषमा बिडवे,ॲड.अनिल सरोदे, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन, ॲड. संदिप वांढेकर उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन, ॲड. स्वाती नगरकर, महिला सचिव अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन, ॲड. आरती गर्जे पाटील,सहसचिव अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन तसेच ॲड. निर्मला चौधरी अध्यक्ष न्यायाधार संस्था अहमदनगर याची उपस्थिती होती.
यावेळी सर्व मान्यवरांनी स्त्री शिक्षणाच्या प्रवाहात आजच्या स्त्री चा महत्वाचा झालेला बदल आणि त्यामूळे समाजाची झालेली प्रगती तसेच ‘समता’ रुपी सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी कश्याप्रकारे केला यावर मत मांडले.
याप्रसंगी ॲड.. निर्मला चौधरी म्हणाल्या”आपण महात्मा फुले यांच्या कार्याला ‘क्रांती’ च्या रुपात बघतो, तर असे कोणते कार्य त्यांनी केले, जे त्यांची ओळख “क्रांती” च्या रुपात आपणास दाखवून देतात हे आपण जाणले पाहिजे. तत्कालीन समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती, अज्ञान, अंधश्रध्दा या विरूद्ध या दम्पत्याने संपूर्ण आयुष्यभर लढा दिला आणि सामाजिक क्रांती केली.
फुले दाम्पत्याने तत्कालीन समाजातील शेतकरी, कष्टकरी, शोषीत, आणि स्त्रीयांच्या संदर्भातील अनेक समस्या जाणल्या, त्यांचे प्रश्न समाज व सरकारपुढे उभे केले, मांडले आणि स्वतः केलेल्या चांगल्या कार्यातून त्याचे उत्तर देखील त्यांनी मिळवले. अशा अनेक समस्यांचे समाधान स्वतःच्या क्रांतीकारी कार्यातुन त्यांनी समाजापुढे मांडले..
या जोडप्यांनी महिलांचे शिक्षण, विधवा महिलांचा उद्धार, अनाथांना आश्रय असे असंख्य आणि मोजता न येणारे कार्य केले. त्यांच्या कार्याची पुण्याई व संविधानाने दिलेले समतेचे अधिकार, यामुळेच आजची ‘स्त्री’ शिक्षण घेऊन घराबाहेर निघू शकते आणि ताठ्मानेने सर्व गोष्टींचा सामना करू शकते आणि आपल्या समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीशी दोन हात कर शकते.
ह्याच स्त्रिया आता प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे.
“ॲड. स्वाती नगरकर यांनी ,” जीच्याहाती पाळण्याची दोरी4 तीच जग उद्धारी . या उक्ती प्रमाणे सर्वच क्षेत्रात महिलाच या आघाडी वर दिसतात.” असे नमूद केले.
यावेळी ॲड. अनिल सरोदे यांनीही मनोगत व्यक्त केले,”सावित्रीबाई यांचा जन्म १८३१ मधे झाला. प्रचलीत प्रथेप्रमाणे वयाच्या ९ व्या वर्षी म्हणजे १८४० ला जोतीबा फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
सन १८४५-४६ मधे म्हणजे वयाच्या १४-१५ व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या शिक्षणाला सुरुवात केली. १४ जानेवारी १८४८ म्हणजेच वयाच्या १७ व्या वर्षाच्या असताना त्यांनी मुलींची पहिली शाळा काढून, अध्यापनाला म्हणजेच शिकवायला सुरुवात केली.
त्यांचे अध्यापनाचे हे कार्य म्हणजे समाजसेवेचा त्यांनी घेतलेला वसा.भारतातील स्त्री जातीवर त्यांचे कधीही न फिटणारे हे उपकार आहे.”
तसेच ॲड. संदिप वांढेकर आणि ॲड. शितल बेद्रे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन लाभलेले जिल्हा कौंटुबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधिश श्रीमती नेत्रा कंक साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगीतले की,” आजची ‘स्त्री’ ही सावित्रीबाई मुळेच शिक्षण घेऊन घराबाहेर निघू शकली.त्यांच्यामुळेच सुसंस्कृत आणि सुशिक्षित झाली आहे. त्या काळी सावित्रीबाई या नसत्या तर आजची स्त्री ही चूल आणि मुल सांभाळत चार भिंतीमध्ये अडकली असती.
आजच्या स्त्री ने शिक्षण हे स्वावलंबन साठी घ्यावे.शिक्षणाचा गैरफायदा घेऊ नये.. स्त्री शिक्षणाची जननी असलेल्या सावित्रीबाई चा वारसा पुढे न्यावा.
स्त्री ने आजच्या पिठीला सुसंस्कृत पणा म्हणजे काय याचे ही माहिती करून द्यावी. स्वातंत्र्य हे सर्वांना पाहिजे,पण त्याचा स्वैराचार नसावा.”
तसेच उपस्थीत असलेल्या ना सुसंकृत व सुशिक्षित या गोष्टी मधील फरक समजला तर सर्वच गोष्टी या सुखकर होतील असेही नमूद केले.
या कार्यक्रमाला ॲड.अनिता दिघे, ॲड. बेबी बोर्डे. ॲड.स्नेहल बनकर , ॲड. करुणा शिंदे, ॲड. सुनीता गोर्डे, ॲड. अस्मिता उदावंत , लोखंडे मॅडम तसेच इतर महीला वकिल उपास्थित होत्या.
या क्रार्यकमासाठी ॲड. निर्मला चौधरी, ॲड.दिक्षा बनसोडे, ॲड. शीतल बेद्रे याची मोलाची मदत मिळाली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड. पल्लवी यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड शीतल बेद्रे यांनी केले.