सैनिक : सीमेवरील महिलांना विद्यार्थिनींनी पाठवल्या ठेवल्या

    231

    अकोले: आपल्या शाळेत शिकलेल्या व देशसेवेसाठी वाहून घेतलेल्या आपल्या गावातील जवानांना (soldiers) व पोलिसांना केळुंगण (ता.अकोले) येथील जय भवानी माता विद्यालयातील विद्यार्थिनींनी (By the students) स्वतः तयार केलेल्या राख्या पाठवत भाऊ-बहिणीचे अतूट प्रेमाचे नाते व भारतीय (Indian) संस्कृतीचे दर्शन घडवले.

    माझी शाळा, माझा अभिमान उपक्रमांतर्गत केळुंगण गावातील जय भवानी माता विद्यालयात शिक्षण घेतलेले मयूर वाळकोळी (दिल्ली), नामदेव देशमुख (पंजाब), श्रीराम लांघी (आंध्र प्रदेश), तुषार देशमुख (तेलंगणा), नामदेव शिवाजी देशमुख (राजस्थान), गणपत भांगरे (हिमाचल प्रदेश), योगेश लांघी है सर्व सैन्यदलात सीमेवर देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. तर हरीश धराडे (सातारा), रामदास बांबेरे (ठाणे) व सखाराम लांघी (मुंबई) हे राज्यात पोलीस दलात कार्यरत आहेत. या सर्वांना विद्यार्थिनींनी स्वतः राख्या तयार करून टपालाने पाठविल्या.

    सुट्टीला आलेले नामदेव देशमुख व योगेश लांघी यांना विद्यालयात आमंत्रित करून त्यांना राख्या बांधल्या. यावेळी अध्यापक एन. एल. जाधव यांनी भूमिपुत्र जवानांचा परिचय करुन देत त्यांना सन्मानित केले. विद्यार्थिनींनी तयार केलेल्या यातील काही राख्या भारतीय सैन्यदलातील इतर जवानांसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. दोन्हीही जवानांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत जिद्द, प्रामाणिकपणा, चिकाटी व कष्ट करण्याचा प्रेरणादायी मूलमंत्र दिला. मुख्याध्यापक पी. वाय. लांडगे, आर. एन. बोंबले व व्ही. व्ही. नवले यांनी विद्यार्थिनींना राख्या बनविण्यास प्रोत्साहित केले. पी. ए. बेंद्रे, एस. वाय. रहाणे यांनी मनोगत व्यक्त केले. व्ही. एल. सातपुते व बी. डी. पोखरकर यांनी सूत्रसंचालन केले. आर. ए. जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी टी. बी. जाधव, जी. एम. धिंदळे, जे. एम. सुपे व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here