सुरेश रैनाचे धक्कादायक खुलासे..! ‘सिनियर्स घाणरडे कपडे धुवायला लावत..!’

449

रैनाने त्याच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत…टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैना याचे नाव सध्या वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आलेय.. ते म्हणजे त्याचे ‘बिलीव्ह’ (Believe : What Life and Cricket Taught Me) हे पुस्तक..! रैनाने या त्याच्या आत्मचरित्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत…रैनाने आपल्या आत्मचरित्राच्या माध्यमातून एक संवेदनशील विषय समोर आणला आहे, तो म्हणजे रॅगिंग.. त्याच्यासोबत सिनियर्स मुलांनी कसे वर्तन केले होते, हे त्याने या आपल्या पुस्तकात मांडले आहे… लखनऊमधील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये काही काळ रैनाला राहावे लागले होते..होस्टेलमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबाबत रैनाने म्हटले आहे, की “या होस्टेलमधील सिनियर्स मुलांनी त्याचा मोठ्या प्रमाणात छळ केला होता.. अभ्यासात, खेळात हुशार असणारी मुले या सिनियर्सची खास टार्गेट असत. ज्युनियर मुलांना ते त्यांची वैयक्तिक कामे करायला लावत.”“रॅगिंगच्या वेगवेगळे प्रकार ते करीत.. मग कधी कोंबडा व्हायला सांगत, तर कधी तोंडावर पाणी फेकत असत. सिनियर्सच्या चहाचे मग माझ्या पलंगाखाली ठेवत. त्यांचा आदेश असे, की सकाळी स्वतः चहा घेण्याआधी मी त्यांना चहा देण्यासाठी त्यांच्या खोलीत जावे. मी फक्त ११-१२ वर्षांचा असेल, पण पहाटे साडेचार वाजता उठून मी या गोष्टी करायचो…!”घाणेरडे कपडे धुवायला लावत..रैना म्हणतो, की “सिनियर्स मुले त्यांचे घाणेरडे कपडे आमच्या खोलीत किंवा पलंगावर फेकत. तसे त्यांचे कपडे धुणे नि पुन्हा त्यांच्याकडे पोहोचविण्याची माझी जबाबदारी होती. सिनियर्स मला त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत. कधी पहाटे साडे तीन वाजता बर्फाचं थंड पाणी अंगावर ओतत, तर कधी मध्यरात्री लॉन कापायला सांगत असत..”“हॉस्टेलमधील या सिनियर्समुळे माझे आयुष्य नरक बनले होते.. आता ते मला भेटल्यावर माझ्याशी आनंदाने बोलतात; पण मला वाटतं त्यांनी माझ्याशी जे केलं, ते किती सहज ते विसरले.”“रॅगिंग अतिशय वाईट गोष्ट आहे.. ती संपवणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही त्याचा बळी असाल, तर स्वत:ला गुन्हेगार समजणे बंद करा नि त्या विरोधात जोरदार आवाज उठवा..”, असेही आवाहन रैनाने आपल्या पुस्तकात केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here