सुप्रीम कोर्ट चे मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर वकिलाकडून बुटफेक..

    22

    सोमवारी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका खटल्याची सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. हा बूट गवई यांच्यापर्यंत पोहोचला नाही. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बूट फेकणारा वकील राकेश किशोर कुमार याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” अशी घोषणाबाजी केली.वकील राकेश किशोर कुमार याची सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणी २०११ पासून आहे. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे भगवान विष्णूच्या ७ फूट उंच पुतळ्याच्या जीर्णोद्धाराबद्दल सरन्यायाधीश गवई यांनी पूर्वी एकदा टिपण्णी केली होती. त्यावर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती, मात्र यावरून नाराज झालेल्या वकिलाने हे कृत्य केल्याचे सांगण्यात येते.या घटनेनंतर, सरन्यायाधीशांनी न्यायालयात उपस्थित असलेल्या वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. ते म्हणाले, “या सर्व गोष्टींनी त्रास करून घेऊ नका. मलाही या गोष्टींनी त्रास होत नाही; या गोष्टी मला काही फरक पडत नाहीत.” असे म्हणत गवई यांनी कामकाज सुरूच ठेवले.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here