- *बुधवार, जानेवारी ५, २०२२*
- *युगाब्द : ५१२३*
- *भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक पौष १३ शके १९४३*
- *सूर्योदय : ०७:१३*
- *सूर्यास्त : १८:१५*
- *चंद्रोदय : ०९:३७*
- *चंद्रास्त : २१:०८*
- *शक सम्वत : १९४३ प्लव*
- *चंद्र माह : पौष*
- *पक्ष : शुक्ल पक्ष*
- *तिथि : तृतीया – १४:३४ पर्यंत*
- *नक्षत्र : श्रवण – ०८:४६ पर्यंत*
- *क्षय नक्षत्र : धनिष्ठा – ०७:११, जानेवारी ०६ पर्यंत*
- *योग : वज्र – १८:१५ पर्यंत*
- *करण : गर – १४:३४ पर्यंत*
- *द्वितीय करण : वणिज – ०१:२६, जानेवारी ०६ पर्यंत*
- *सूर्य राशि : धनु*
- *चंद्र राशि : मकर – १९:५४ पर्यंत*
- *राहुकाल : १२:४४ ते १४:०७*
- *गुलिक काल : ११:२१ ते १२:४४*
- *यमगण्ड : ०८:३६ ते ०९:५८*
- *अभिजितमुहूर्त : कोई नहीं*
- *दुर्मुहूर्त : १२:२२ ते १३:०६*
- *अमृत काल : २१:२८ ते २२:५८*
- *वर्ज्य : १२:३० ते १४:००*
- *कादंबरीकार श्रीपाद नारायण पेंडसे* *- कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच श्री.ना.पेंडसे यांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. ‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही. व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे त्यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते.*
- *त्यांना सुचलेल्या कादंबऱ्या या बहुश: त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाहिलेल्या माणसांवरून सुचलेल्या आहेत.* *घटना-प्रसंग, निवेदन, संवाद, भाषाशैली ह्यांसारख्या कादंबरीच्या घटकांची वेगवेगळी जाणीव ठेवून कांदबरीत केल्या जाणाऱ्या कृत्रिम सजावटीचे तंत्र पेंडसे ह्यांनी स्वीकारले नाही त्यांच्या प्रत्येक कादंबरीतील जीवनानुभव सहज-स्वाभाविकपणे रूपास येत गेला त्यामुळे कादंबरीच्या रूपाची एक वेगळी, अधिक परिपक्व जाणीव जोपासणारे कादंबरीकार म्हणूनही ते ख्याती पावले.*
- *विशिष्ट प्रदेशात आणि वातावरणात माणसांची मने आणि जीवने कसकसे रंग धारण करतात, ह्यासंबंधीच्या शोधातून आणि आकलनातून जन्माला आल्यामुळे पेंडशांच्या कादंबरीला मोठे बळ लाभलेले आहे. यशोदा , गारंबीचा बापू , असं झालं आणि उजाडलं ही त्यांची नाटके लिहिली आहेत.*
- *रथचक्र, लव्हाळी आणि ऑक्टोपस ह्या तीन कादंबऱ्या, पेंडशांच्या कादंबरीने घेतलेल्या वेगळ्या वळणाच्या द्योतक आहेत. ह्या कादंबरीला साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले ,तसेच जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.*
- *१९१३ : मराठी साहित्यिक श्रीपाद नारायण पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू : २३ मार्च, २००७)*
- *घटना :*
- *१६६४ : छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या सीमेवर पोहोचले. त्यांनी सुरतेचा सुभेदार इनायत खान याला खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला.*
- *१६७१ : छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांकडून साल्हेर काबीज केले.*
- *१९४९ : पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.*
- *१९९८ : ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.*
- *२००४ : संभाजी ब्रिगेड या संघटनेने केलेल्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.*
- *•मृत्यू :*
- *• १९७१ : भारतीय जादुगार पी. सी. सरकार यांचे निधन. (जन्म : २३ फेब्रुवारी, १९१३)*
- *• १९८२ : भारतीय संगीतकार रामचंद्र चितळकर उर्फ सी. रामचंद्र यांचे निधन. (जन्म : १२ जानेवारी, १९१८)*
- *• १९९२ : इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन. (जन्म : ३ जुलै, १९१४)*
- *• २००३ : पखवाजवादक गोपालदास पानसे यांचे निधन.*
- *जन्म :*
- *१८६८ : मराठी संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू यांचा जन्म.*
- *१८९२ : लेखक व मराठी भाषातज्ञ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू : १२ जून, १९६४)*
- *१९२२ : आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते मोहम्मद उमर मुक्री यांचा जन्म. (मृत्यू : ४ सप्टेंबर, २०००)*
- *१९४१ : भारतीय क्रिकेट कप्तान आणि पतौडी संस्थानचे ९वे व शेवटचे नबाब मन्सूर अली खान पतौडी यांचा जन्म. (मृत्यू : २२ सप्टेंबर, २०११)*
- *आपला दिवस मंगलमय जावो





