सुधीर मोरे आत्महत्या : राहुल गटाला धक्का ; सुधी मोरेंची धावत्या लोकल खाली

    141

    नगर : मुंबईत ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir Moreयांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ (Ghatkopar Railway Stationरेल्वेच्या रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. सुधीर मोरे यांनी लोकल ट्रेनसमोर उडी मारुन आत्महत्या (Suicideकेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

    रेल्वे रुळावर काल (ता. ३१) रात्री सुधीर मोरे यांचा मृतदेह सापडला. रात्री त्यांना एक फोन आला. यावेळी मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे, असं खासगी सुरक्षारक्षकाला सांगत ते घाईत घराबाहेर पडले. त्यांनी बॉडीगार्डला आपल्यासोबत नेलं नव्हते. गाडी न घेता रिक्षाने गेले. मात्र घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले. तिथे साडेअकराच्या दरम्यान रुळावर झोपले. कल्याण वरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचं पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

    सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. ते मुंबईतल्या विक्रोळी पार्कसाईट इथले शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. गेल्या काही महिन्यांपासून सुधीर मोरे यांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं आहे. दोन महिन्यांपूर्वीच काही कॉल रेकॅार्ड करण्यासाठी त्यांनी एक नवीन मोबाईल फोन देखील घेतला होता. हा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घ्यावा अशी विनंती सुधीर मोरेंच्या जवळच्या लोकांनी केली आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here